*मुंबई येथील काँग्रेसच्या महामेळाव्यास गडचिरोलीतून हजारो पदाधिकारी राहणार उपस्थित*
*राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त 20 ऑगस्ट रोजी मुंबई येते काँग्रेसचा महामेळावा*
गडचिरोली :: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 20 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई येथील BKC मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्यास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जून खर्गे, लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी सह देशातील आणि राज्यातील काँग्रेसचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. या महामेळाव्यात सहभागी होण्याकरीता व आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनाकरीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गडचिरोली जिल्हा हा काँग्रेसचा गड असून जिल्ह्यातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते मुंबई येथील महमेळाव्यास उपस्थित राहतील असे मत व विश्वास जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी व्यक्त केला.
या बैठकीस माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार आनंदराव गेडाम, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पोरटी, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, सगुणा तलांडी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, प्रभाकर वासेकर, पुष्पलता कुमरे, शँकरराव सालोटकर, अनिल कोठारे, अब्दुल पंजवानी, हनुमंत मडावी, छगन शेडमाके, वामनराव सावसाकडे, रजनीकांत मोटघरे, भारत येरमे, डॉ. सोनल कोवे, रामदास मसराम, डॉ. शिलूताई चिमूरकर, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, राजेंद्र बुल्ले, मनोज अग्रवाल, प्रमोद गोटेवार, डॉ. पप्पू हकीम, लक्षमिकांत बोगामी, मुस्ताक हकीम, देवाजी सोनटक्के, दत्तात्र्यय खरवडे, नेताजी गावतुरे, सुनील चडगुलवार, हरबाजी मोरे, नरेंद्र डोंगरे, निजाम पेंदाम, रुपेश टिकले, निकेश गद्देवार, सुनील डोगरा, उत्तम ठाकरे, मंगला कोवे, आरती कंगाले, मालता पुळो, तनुजा कुमरे, उषा धुर्वे, गीता सुरेश सलामे, पुष्पाताई शिडाम, वर्षा आत्राम, भैयाजी मुद्दमवार, गजानन दुगा, रमेश इंगळे, पुरुषोत्तम सिडाम, सुनील चडगुलवार, जितेंद्र मुनघाटे, स्वप्निल बहरे, विजय राऊत, हरबाजी मोरे, नरेंद्र गजपुरे, लालाजी सातपुते, गुलाबराव मडावी, राजाराम ठाकरे, शुभम शेंडे, अण्णाजी जेंगठे, धनराज जेंगठे, रमेश मानकर, नदीम नाथांनी, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल एलट्टीवार, कुणाल ताजने, जावेद खान, माजिद सय्यद, चारू पोहने, अनिल किरमे, दिवाकर पोटफोडे, विनोद कुंभारे, कैलाश वानखेडे, दुशांत वाटगुरे, जितेंद्र पुराम, योगेंद्र गेडाम, पार्वती मसराम, रेखा आत्राम, आचल चलकलवार, रजनी तन्नेरवार, वैशाली कोमलवार, प्रभाकर तुलावी, सखाराम मडावी, कोलु पुंगाटी, किसन हीचामी, श्रीनिवास ताडपलीवार, अमजद खान,गिरीधर तीतराम, अंकित वरघंटीवार सह मोठ्या संख्येने काँग्रेस कर्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.