गडचिरोली पोलीस दलातील 17 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे “पोलीस शौर्य पदक व 01 अधिकारी यांना “गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक” जाहिर

70

 

गडचिरोली पोलीस दलातील 17 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे “पोलीस शौर्य पदक व 01 अधिकारी यांना “गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक” जाहिर

 

* गडचिरोली पोलीस दलातील 96 पोलीस अंमलदार यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला मिळाली पदोन्नती

 

देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला मा. महामहीम राष्ट्रपती यांचे संपूर्ण देशभरात एकुण 208 पोलीस शौर्य पदक व 624 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहिर झाले असून, त्यापैकी गडचिरोली पोलीस दलास 17 पोलीस शौर्य पदक व 01 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहिर झाले आहेत. तसेच यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला 18 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक व 01 पोलीस अधिकारी यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले होते. यावर्षी सन 2024 मध्ये एकुण 35 पोलीस अधिकारी/अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक व 02 अधिकारी व अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले असून मागील चार वर्षात (सन 2020 पासून) गडचिरोली पोलीस दलास एकुण 03 शौर्य चक्र, 203 पोलीस शौर्य पदक व 08 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहे.

 

पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार 1) अनुज मिलींद तारे, पोलीस अधीक्षक, वाशिम 2) डॉ. कुणाल शंकर सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा, जि. जळगाव 3) राहुल नामदेवराम देव्हडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, 4) धनाजी तानाजी होनमाने, (शहिद) पोलीस उपनिरीक्षक, 5) दिपक रंभाजी औटे, पोलीस उपनिरीक्षक 6) विजय दादासो सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक, 7) पोहवा/3068 महेश बोरु मिच्चा, 8) पोहवा/3101 कोतला बोटू कोरामी, 9) पोहवा/3161 नागेशकुमार बोंदयालु मादरबोईना, 10) पोहवा/5232 समय्या लिंगय्या आसम, 11) पोहवा/6026 महादेव विष्णु वानखेडे, 12) पोनाअं/1677 विवेक मनकु नरोटे, 13) पोअं/3875 मोरेश्वर नामदेव पोटावी, 14) पोअं/5168 कोरके सन्नी वेलादी, 15) पोअं/5236 कैलास चंुगा कुळमेथे, 16) पोअं/5605 शकील युसूफ शेख, 17) पोअं/5750 विश्वनाथ समय्या पेंदाम यांना पोलीस शौर्य पदक मिळाले असून, 1) मधुकर पोचा नैताम, पोलीस उपनिरिक्षक यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहेत.

 

सन 2017 मौजा कापेवंचा-कवठाराम, सन 2019 मोरमेट्टा व सन 2022 मध्ये कापेवंचा-नैनेर येथे झालेल्या पोलीस माओवादी चकमकीमध्ये एकुण 04 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यास गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले होते. वरील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सदरच्या चकमकीमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीची दखल घेऊन मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहिर झाले.

 

 

 

यासोबतच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला गडचिरोली पोलीस दलात कार्यरत 41 पोलीस हवालदार यांना सहाय्यक फौजदार पदी व 55 पोलीस नाईक अंमलदार यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती मिळाली आहे. यावेळी राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त व पदोन्नती प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले आहे व त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

 

।।।।।।।