आरमोरी जोगिसखरा मार्गावरील रामपूर फाट्यावर भीषण अपघातात

178

आरमोरी जोगिसखरा मार्गावरील रामपूर फाट्यावर भीषण अपघातात

एका महिलेचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी

आरमोरी –

:-
आरमोरी तालुक्यातील रामपूर फाट्यावर ट्रक ने मोटार सायकल ला जोरदार धडक दिली, त्यात एका चार वर्षाच्या मुलीसह तीन जण गंभीर जखमी तर एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना दिनांक 26 फरवरी 2021 ला तीन वाजताच्या सुमारास घडली जोगीसाखरा येथील लालाजी मेश्राम यांच्या मुलीच्या लग्न समारंभ करिता चंद्रपूर जिल्ह्यातील मांगली येथील कालिदास मेश्राम वय 55 वर्ष, कालींदा कालिदास मेश्राम वय 50 वर्ष ,चंद्रभागा महादेव मेश्राम वय 65 वर्ष व चैताली पुण्यवान सहारे वय चार वर्ष हे लग्न आटपून गावाकडे जाण्यास निघाले .
दरम्यान आरमोरी कडून येणारा ट्रक क्रमांक mh-34 ए 61 14 ने मोटर सायकल ला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात चारही जन जखमी झाले .जखमींना आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र चंद्रभागा मेश्राम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला व अन्य जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी हे करीत आहेत