भद्रावती नगर परिषदेचे सन2021-22 चे शिलकी अंदाजपत्रक सादर

75

भद्रावती नगर परिषदेचे सन2021-22 चे शिलकी अंदाजपत्रक सादर

अर्थसंकल्पामध्ये शहर विकास कामांवर तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर व स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आलेला आहे .

भद्रावती:- नगरपालिकेत 25 फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अनिल धानोरकर यांनी सन 2021-22 चे प्रस्तावित अंदाज पत्रक 119,77,44,156 रुपयांचे एकूण प्रारंभिक सादर केले असून आर्थिक वर्षात119,77,66,000/- रुपये अपेक्षित खर्च असून19,78,156/- एवढी रक्कम नगरपालिकेकडे शिल्लक आहे.
सदर अर्थसंकल्पामध्ये शहर विकास कामांवर तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर व स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आलेला आहे . राज्य नगरोत्थानअंतर्गत भुयारी गटार योजना, प्रोत्साहनात्मक निधी अंतर्गत चौक सौंदर्यीकरण, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बेघरांना घरकुल योजना,दलित वस्ती निधी अंतर्गत दलित वस्ती विकसित कामे इत्यादी नियोजन केले आहे, भद्रावती शहरातील नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा करण्याचा मानस आहे. एन यु एल एम(NULM) अंतर्गत भद्रावती शहरातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीकरिता केंद्र म्हणजेच शहर उपजीविका केंद्र उभारण्याचे नियोजन केले आहे. तसेच गरीब नागरिकांना केटरिंग चे साहित्य बचत गटामार्फत नगर पालिके मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गरजू नागरिकांना कपडे देण्याचा उपक्रम म्हणजे माणुसकीची भिंत सुरू करण्याचा मानस आहे. तसेच बुक बॅक अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच सदर अर्थसंकल्पामध्ये लोक कल्याणकारी उपक्रमांवर भर देण्यात म्हणजे मागासवर्गीय व दुर्बल घटकांवर, महिला व बालकल्याण, दिव्यांग घटकांवर, क्रीडा अंतर्गत राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक या घटकांवर विशेष तरतूद करण्यात आली आहे.
सदर अंदाजपत्रक तयार करण्याकरिता नगराध्यक्षआनिल धानोरकर, अधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच अंदाजपत्रकाचे वाचन लेखापाल लहू लेंगरे यांनी केले. लेखापरीक्षक दिलेखापरीक्षक दिलीप बोरा व लिपिक आशिष देशमुख यांनी अन्दाजपत्रक तयार करण्यास सहकार्य केले.सभेत सर्व सन्माननीय पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.भद्रावती नगर परिषदेचे सन 2021-22 या वर्षातील शिलकी अन्दाजपत्रक सर्वानुमते मंजुर करण्यात आले.