*गडचिरोली येथे लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रम संपन्न…..*
*राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र जी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण हा कार्यक्रम आँनलाईन आभासी पद्धतीने गडचिरोली येथील महिलांच्या खात्यात रुपये जमा होऊन लाभ मिळवलेल्या महिलांशी केला वार्तालाप….*
*वि.प.आमदार डॉ. परिणयजी फुके यांच्यासह मा.खा. अशोकजी नेते यांची ही गडचिरोलीत कार्यक्रमाला उपस्थिती…*
दिं. १९ ऑगस्ट २०२४
गडचिरोली:-लाडक्या बहिणींचा देवाभाऊ हा कार्यक्रम दि.१८ ऑगस्ट २०२४ रोज शनिवारी अभिनव लाँन,चंद्रपुर रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहुन आलेल्या लाडक्या बहिणींशी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र जी फडणवीस यांनी आँनलाईन आभासी पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधला तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे रूपये खात्यात जमा झाले का ? यावर उपस्थिती सर्व महिलाच्या वाणीतून एकच सूर गूंजत निघाला आमच्या खात्यात लाडकी बहीण या योजनेचे रुपये जमा झाले आहेत.परत मान.उपमुख्यमंत्री यांनी या योजनेच्या अनुषंगाने महिला भगिनींना प्रतिक्रिया विचारली असता यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील दोन महिला भगिनींनी आँनलाईन बोलत जिल्यातील एका महिलेनं उपमुख्यमंत्री मान. देवेंद्र जी फडणवीस यांच्याशी बोलतांना म्हणाली काँग्रेसवाल्यांनी आमच्या गावातल्या बायांना खटाखट साडेआठ हजार मिळणार म्हणून फसवीलं पण तुम्ही जे सांगितलं ते करुन दाखवलं आज माझ्यासारख्या गरीब बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत यांचा आनंद असून आपणाला धन्यवाद देतोय !
दुसऱ्या महिलेनं उपमुख्यमंत्री मान. देवेंद्र जी फडणवीस यांच्या सोबत बोलत माझे पती गेल्यानंतर मी एकटीनेच संसाराचा रहाटगाडा चालवते… यात तुम्ही दिलेली १५०० रूपयांची ओवाळणी मला माझ्या माहेरचा आधार वाटतो… घर कुटुंब व्यवस्थित चालविण्यासाठी छोटे मोठे खर्च, जीवनावश्यक वस्तु इ.खर्च असून खात्यात ओवाळणी म्हणून जमा केली.
देवाभाऊ हाच माझा लाडकाभाऊ आहे…असे उदगार या महिलांनी व्यक्त केले.
आपण दिलेला शब्द खरोखर पाळला व खात्यात रूपये टाकून बहिणींला एक आधार दिला.मि आपल्या पाठीशी व आपल्या पार्टीशी खंबीरपणे उभी आहे.असा शुभाशीर्वाद देत आभार मानले.
याप्रसंगी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी या कार्यक्रमाला संबोधीत करतांना म्हणाले महिला भगिनींसाठी अतिशय महत्वाची योजना आहे.या योजनेबद्दल विरोधक उलटसुलट बोलत होते.फॉर्म फक्त भरून घेत आहे पण खात्यात रुपये जमा होतील तेव्हा ना.. अशाही पद्धतीचा अपप्रचार केला जात होता.पण आता महिलांच्या खात्यात रुपये जमा होत आहेत विरोधक दिशाभूल करणारे आहेत. मी सुद्धा गडचिरोली व चामोर्शी या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा सर्व प्रथम प्रसार व प्रचार केला.या योजनेचा गडचिरोली व चामोर्शी येथे कार्यालय खोलून महिला भगिनींना याचा त्रास होऊ नये यासाठी स्वतः माझ्या कार्यालयातील वाँर रूमची टीम कामाला लावून महिला भगिनींचे ऑनलाईन फॉर्म भरून अनेक महिला गडचिरोली व चामोर्शी येथील महिला भगिनीं योजनेस पात्र ठरल्या व त्यांच्या खात्यात रुपये ही जमा झाले याचाही मला आनंद आहे.
तसेच गडचिरोली जिल्यातील अनेक महिलां भगिनींनी मा.खा.नेते यांना रक्षाबंधन निमित्ताने राखी बांधली. महिला भगिनींच्या पाठीशी सदैव उभा राहीन असा विश्वास मा.खा.नेते यांनी यावेळी व्यक्त केला.
महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ ह्यांनी केलेले संचालन अतीशय सुरेख व सुंदर होते.गडचिरोली जिल्ह्याविषयी असलेले विशेष प्रेम ताईच्या संचालन वाणीतून प्रकटतांना दिसुन आले.
यावेळी प्रामुख्याने कार्यक्रमाला वि.प.आमदार डॉ.परीणयजी फुके,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,आमदार क्रिष्णाजी गजबे,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.गीताताई हिंगे,डॉ.चंदाताई कोडवते,जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉ.मिलींद जी नरोटे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ तिडके,ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर,अनु.जाती मोर्चा जिल्हाध्यक्षअँड. उमेशजी वालदे,तालुकाध्यक्ष विलास पा.भांडेकर,तालुकाध्यक्षा लताताई पुंगाटे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारतजी खटी, जिल्हा सचिव सौ.रंजिता कोडाप,सौ.वर्षाताई शेडमाके, नगरसेविका रोशनीताई वरघंटे,रहिमा सिद्धीकी तथा बहुसंख्येने जिल्यातील महिला उपस्थित होत्या.