धानोरा तालुक्यातील कामे तातडीने पूर्ण करुन विकास साधावा

95

धानोरा तालुक्यातील कामे तातडीने पूर्ण करुन विकास साधावा

आमदार डॉ देवरावजी होळी

पंचायत समिती धानोरा येथे आमदार डॉ देवराव जी होळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

धानोरा
दिनांक 27फेब्रुवारी2021

एफ एच. टी. सी.अंतर्गत सोलर पंप च्या मिनी वॉटर सप्लाय योजनेच्या कामात होणाऱ्या हयगयीची चौकशी करून दोषीवर तात्काळ चौकशी करावी व प्रलंबीत विकास कामांना तातडीनं मार्गी लावावे असे निर्देश धानोरा पंचायत समितीच्या आढावा बैठकीमध्ये आमदार डॉ देवरावजी होळी यांनी दिले. बैठकीला उप अभियंता चवंडे ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, प स. सभापती अनुसया ताई कोरेटी, उपसभापती विलासजी गावडे, जिल्हा परिषद सदस्य लताताई पुंघाटे, जिल्हा परिषद सदस्य राजुभाऊ जिवानी,जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे ,तालुका अध्यक्ष शशिकांतजी साळवे, साईनाथजी साळवे , संवर्ग विकास अधिकारी निमसरकार साहेब, सर्व पंचायत समिती सदस्य व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते
बैठकीमध्ये पेसा मोबीलायझरना 2 हजार पाचशे रूपये मानधन मिळूनही योग्य प्रकारे काम होत नसल्याने त्यांना योग्य काम करण्याचे निर्देश दिले
कोणत्याही कृषी पंप विज धारकाचे वीज कापण्यात येऊ नये एस टी.एस.सी पंप धारकांना विज डिमांड तात्काळ देण्यात यावी असे निर्देश दिले. धानोरा तालुक्यातील घरकुलाचे काम चांगल्या प्रकारे होत असून नवीन 12 हजार घरकुलांना मंजुरी देण्यात यावे असे निर्देश दिले.
तालुक्यामध्ये दुधाळ जनावरांची संख्या 9500 असूनही दूध संकलन मात्र एकही नसल्याने आमदार महोदयांनी नाराजी व्यक्त केली.
तालुक्यातील ग्रामपंचायतींची थकबाकी कमी असून ती वाढविण्यासाठी व वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे व त्याचा उपयोग विकास कामांमध्ये करावा असे निर्देश दिले. रोजगार हमी योजने अंतर्गत 9 हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करूनदिला जात असला तरी ते वाढविण्याची गरज असून किमान हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे असेही सुचविले. पडलेल्या अंगणवाडीच्या इमारतींच्या बांधकामांना तातडीने मंजुरी देण्यात यावी. त्याचबरोबर रिक्त असलेल्या पदांची भरती करण्यात यावी असेही निर्देश दिल