*समस्या सोडविण्याची जबाबदारी माझी:मंत्री धर्मराव बाबा आत्राम*
*दामरंचा येथे थेट जनतेत जाऊन साधले संवाद*
*राज्याच्या शेवटच्या टोकावरील गावात जल्लोषात स्वागत*
अहेरी:सर्वसामान्य लोकांनी निवडून दिल्यानेच मला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे.मंत्री झालोय म्हणून मुंबईत बसून काम चालणार नाही.ज्या सर्वसामान्य जनतेनी विश्वास दाखवून मला आमदार म्हणून निवडून दिले त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्राधान्याने सोडविणे ही माझी पहिली जबाबदारी आहे.जनतेत गेल्याशिवाय समस्या कळणार नाही त्यामुळेच आपल्यापर्यंत आलोय,तुम्ही फक्त समस्या सांगा असे आवाहन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेवरील इंद्रावती नदीच्या काठावरील अहेरी तालुक्यातील दामरंचा या गावात अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून माजी प स सदस्य रामेश्वर बाबा आत्राम,माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ता मलय्या साकेट,हनमंतू आलाम, कमलापूर चे माजी सरपंच सांबय्या करपेत,कैलास कोरेत,माजी प स सदस्य मांतय्या आत्राम,पोलीस पाटील विश्वनाथ आलाम,माजी प. स. सदस्य राकेश पनेला, माजी सरपंच पापय्या सुरमवार,माजी सरपंच जिलकरशाही मडावी,बाबुराव तोरेम,सुधाकर कन्नाके,रवी सुरमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मी मुंबईत असो की अहेरीत आपल्याला जनतेचे काम करायचे आहे.मागील काही दिवसांपासून विविध भागातील कार्यकर्ते आणि सर्व सामान्य जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. दामरंचा परिसर देखील दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो किंबहुना राज्याच्या शेवटचा टोकावरील हा गाव असून सर्वांना माझी भेट घेण्यासाठी अहेरी येणे शक्य होत नाही त्यामुळेच मी स्वतः आपल्या भेटीसाठी आलो आहे.असे बोलत थेट जनतेत जाऊन त्यांनी समस्या जाणून घेतली.यावेळी उपस्थितांनी चर्चेच्या माध्यमातून समस्या सांगितले.त्यात विजेची समस्या,भ्रमणध्वनी समस्या, तसेच काही आदिवासी लोकांना जातीचे दाखले नसल्याचे सांगण्यात आले.या सर्व समस्या प्राधान्याने सोडविन्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले.तसेच लिफ्ट इरिगेशनचे बंद असलेले काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे सांगितले.या मेळाव्यात दामरंचा,मांडरा, रुमालकसा, तोंडेर, चिंतारेव, चिटवेली, वेलगुर,भंगारमपेठा,कोत्तापेठा,कोयागुडम,मोदुमडगू आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान दामरंचा येथे आगमन होताच परिसरातील नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे जल्लोषात स्वागत केले.त्यांनतर मेळाव्याला सुरुवात करण्यात आले.यावेळी आदी मान्यवरांनी देखील मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कैलास कोरेत यांनी केले.