आज गडचिरोली जिल्ह्यात 21 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्त

155

आज 21 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.27:आज जिल्हयात 21 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9535 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9331 वर पोहचली. तसेच सद्या 98 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 106 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.86 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.03 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.
नवीन 21 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 09 जणाचा समावेश असून अहेरी तालुक्यातील 2, आरमोरी तालुक्यातील 3, चामोर्शी तालुक्यातील 7, जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 9 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 07, अहेरी तालुक्यातील 1, तर कुरखेडा तालुक्यातील 1 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील झेड पी हायस्कुल क्वार्टर 1, स्थानिक 1, नगरपरिषदच्या मागे 3, कोटगल हेटी 2, रामनगर 1, कारमेल स्कुलच्या मागे 1, अहेरी तालुक्यातील सीआरपीएफ जवान 1, नागेपल्ली 1, आरमोरी तालुक्यातील स्थानिक 3, चामोर्शी तालुक्यातील स्थानिक 2, घोट 5, यांचा समावेश आहे.
तर इतर जिल्हयातील बाधिता मध्ये 0 जणांचा समावेश आहे.