आरमोरी येथे शहिद नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन

25

आरमोरी येथे शहिद नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन

13 वर्षे पुर्वी 20 ऑगस्ट 2013 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. महाराष्ट्रतील अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अंनिस च्या वतीने करण्यात येत होते.

अंनिस व नरेंद्र दाभोलकर यांच्या मुळे समाजातील अनेक भोंदूगिरी चा पर्दाफाश झाला होता.समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता या तत्त्वावर भारतीय लोकशाही, संविधान तयार करण्यात आले आहे. आपल्या संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात निर्माण होण्यावर भर दिलेला आहे. संविधानाच्या या तत्त्वावर अंनिस व शहिद नरेंद्र दाभोलकर याचे काम सुरू होते पन या देशातील ज्यांना संविधान,समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता व वैज्ञानिक दृष्टिकोन या गोष्टी मान्य नाही आहे त्यांनी नरेंद्र दाभोलकरावर बंदुकीच्या गोळ्या चालवुन त्यांची हत्या केली.पन हत्या माणसाची होऊ शकते विचारांची नाही. गांधी , पानसरे, दाभोलकर यांना मारुन त्याचे विचार दाबता येऊ शकत नाही असे मत अंनिस च्या विभाताई बोबाटे यांनी आपल्या शहिद नरेंद्र दाभोलकर यांच्या शहिद दिनी मत मांडले.

या अभिवादन सभेत सागर मने,रंजीत बनकर, निखिल धार्मिक, राहुल जुवारे,योजनाताई मेश्राम ,शिल्पा मेश्राम,लिलाधर मेश्राम, अमोल मारकवार, संजय वाकडे ,सुरेश मेश्राम हे उपस्थित होते.