महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ तालुका.महाविकास आघाडी मैदानात. एटापल्ली;(गडचिरोली ) तालुका महाविकास आघाडीच्या नेतृत्वात येथील संविधान चौकात देश व राज्यातील विविध घटनांमध्ये चिमुरड्या बालीका व महिलांवर अत्याचारा विरुद्ध निदर्शने करून तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे, यावेळी बदलापूर, नागभीड व अन्य घटनेतील महिलांवर अत्याचार करणार्या नराधमांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित श्री सतीश मुप्पलवार शहर अध्यक्ष कॉंग्रेस कमिटी निजान पेंदाम कॉंग्रेस नगरसेवक प्रज्वल नागुलवार ताराताई गावडे महिला तालुका अध्यक्ष कॉंग्रेस नामदेव हिचामी नगरसेवक सचिन मोतकुरवार तेजस गुज्जलवार संपत करमरकर राजेश सिकदर सुरज जकुलवार विकी पुज्जलवार पंकज पतीवार अनिल तेलकुंटलवार योगेश नागभिडकर रंजीत लेकामी शरीफ शेख जुबेदा शेख बबीता गोटा सवीता गोटा अनीता कुमरे उपस्थित होते.