*तेली समाजाने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पाठीशी राहावे.*

25

*तेली समाजाने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पाठीशी राहावे.*

 

*प्रांतिक तेली समाज महासभेचे  नेते बाबुरावजी कोहळे यांचे तेली समाजाच्या मेळाव्यात आवाहन*

 

*गडचिरोली येथे तेली समाजाचा भव्य मेळावा*

 

*विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व देऊन तेली समाजाला न्याय द्यावा  प्रांतिक तेली महासंघाचे विदर्भ अध्यक्ष जगदीश भाऊ वैद्य यांची मागणी*

 

*गुणवंत विद्यार्थी ,नवनियुक्त अधिकारी व कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा केला सत्कार*

 

*दिनांक २६ ऑगस्ट गडचिरोली*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी तेली समाजाच्या विविध मागण्यांची पूर्ती करीत मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी नेहमीच तेली समाजावर विशेष प्रेम केले आहे. त्यामुळे   तेली समाज आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी नक्कीच उभा राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे यांनी सेलिब्रेशन हॉल गडचिरोली येथे तेली समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने आयोजित तेली समाज मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना केले.*

 

*यावेळी मंचावर आमदार डॉक्टर देवरावजी होळी, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे विदर्भ अध्यक्ष जगदीशभाऊ वैद्य ,नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पुष्कर जी डांगरे, जागतिक तेली महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जी पिपरे, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, पतसंस्थेचे अध्यक्ष श्री भैय्याजी सोमनकर,  नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ योगिताताई पिपरे, तालुका भाजपाचे अध्यक्ष विलासजी भांडेकर शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे,  युवा नेते मधुकरराव भांडेकर, प्रांतिक तेली महासभा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष लताताई कोलते, नगरसेविका वैष्णवी ताई नैताम प्रामुख्याने उपस्थित होते.*

 

*यावेळी बोलताना बाबुरावजी कोहळे म्हणाले की, आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. जिल्ह्यामध्ये कोडगल  बॅरेज ,मेडिकल कॉलेज, मोठ्या प्रमाणावर रस्ते ,विविध शासकीय इमारतीसाठी लागणारा निधी ,सुरजागड कोणसरीसारखे उद्योग व रोजगार देणारे प्रकल्प त्यांनी खेचून आणून जिल्ह्याच्या विकासाला नवी गती दिली. तेली समाजासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी नेहमीच ओबीसी हिताच्या दृष्टीने काम केले त्यांचे काम खरोखर कौतुकास्पद असून येणाऱ्या काळात तेली समाजाने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पाठीशी संपूर्ण शक्तीनिशी उभे राहावे असे आवाहन  त्यांनी याप्रसंगी केले.*

*या मेळाव्याच्या निमित्ताने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी ,नवनियुक्त अधिकारी व कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.*

 

*कार्यक्रमाला नागपूर वरून आलेले विशेष मार्गदर्शक महाराष्ट्र प्रांतिक तेली महासंघाचे विदर्भ अध्यक्ष जगदीश भाऊ वैद्य यांनी तेली समाजातील नेतृत्वाला विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व देऊन तेली समाजाला न्याय द्यावा अशी मागणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी राज्यकर्त्यांना केली.  या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांना आमदार डॉक्टर देवरावजी होळी, प्रांतिक तेली संघाचे नागपूर ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष पुष्करजी डांगरे, तेली समाजाचे नेते रमेशजी भुरसे , प्रमोद जी पिपरे, सौ. योगिताताई पिपरे, लताताई कोलते, मधुकरजी भांडेकर, यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्तेश्वर काटवे यांनी तर  संचालन विलासजी भांडेकर यांनी केले.*