*2 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन*
गडचिरोली दि. 29 : माहे सप्टेंबर महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. 2 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.
लोकशही दिनी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2 ते 3 वाजेपर्यत राहील आणि सभेला 3 वाजता सुरुवात होईल. ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र-1 अ ते 1 ड) दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहील. तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
0000