*सूंदरनगर येथील भारतीय जनता पार्टीचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश…!*
*काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी शाल व पक्षाचे दुप्पटा टाकून स्वागत…!*
मुलचेरा : तालुक्यातील सुंदरनगर येथील भारतीय जनता पार्टीचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या भाजपा पक्षाला रामराम करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केले.या पक्षप्रवेशत हितेश हलदार,हमीर दास,तनमय बनिक,विजय मजुमदार,मनीषा रॉय,अजय बाला,प्रभान बनिक,राजेश दास,प्रकाश दास,सुजल रॉय,दृवा घोष,अजय विश्वाससह अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे काँग्रेसचे हात धरले.
सदर पक्षप्रवेश सोहळा काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडलवार यांच्या जनसंपर्क कार्यालय राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार व खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात तर काँग्रेसनेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेखा आलम व कवड्डजी चलावार रॉय काका यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार,आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या हस्ते शाल व पक्षाचे दुप्पटा टाकून पक्षात स्वागत करण्यात आले.
दरम्यान उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गम,स्वप्नील मडावी सचिन पंचार्य,राकेश सडमेकसह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.