*निवडणुका आले की काही लोकं घराबाहेर पडतात:मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची बोचरी टीका*
*जारावंडी येथे भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न*
*दुर्गम भागातील हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती*
एटापल्ली: जनतेचे सेवक हे नेहमीच मैदानात असतात.२०१९ ची विधानसभा निवडणूक झाल्यावर एकही नेता मैदानात दिसला नाही.आज पर्यंत कोण कुठे लपून बसला हेच कळत नाही.मात्र विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच काही लोकं घराबाहेर पडत असल्याची बोचरी टीका राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केली.
एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी उदघाटक म्हणून ते बोलत होते.या कार्यकर्ता मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य तनुश्री धर्मराव बाबा आत्राम, राकॉ चे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,राकॉचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, जारावंडीचे सरपंच सपना कोडापे,उपसरपंच सुधाकर टेकाम, सरखेडाचे सरपंच वर्षा उसेंडी, घोटसुरचे सरपंच कोरामी,दिंडवीचे उपसरपंच कौशिक आवडे,तोहागावचे सरपंच जगुजी देहारी,माजी जि प सदस्य संजय चरडुके,माजी जि प सदस्य रामजी कत्तीवार,एटापल्ली पंचायत समितीचे माजी उपसभापती जनार्धन नल्लावार,अहेरीचे माजी प स सदस्य मांतय्या आत्राम,पापा पुण्यमूर्ती वार,कैलास कोरेत,कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत,बाळू राजकोंडावार,दसरू मट्टामी, घनश्याम नाईक, इशांत दहागावकर,श्रीहरी मोहुर्ले, मल्लाजी येनगंटीवार, ज्ञानदेव मडावी, उत्तम चौधरी, अनिल ठाकरे, गुरुदास टिंगूसले, गजानन गुरनुले, महेश कोडापे, शितल इष्टाम, विश्वनाथ इष्टाम आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गेली पाच वर्षात आपल्या विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी पाहिजे ती निधी उपलब्ध करून दिल्याने अनेक विकास कामे झाली आणि बरेच कामे प्रगतीपथावर आहेत. महायुती सरकार स्थापन झाल्यावर केवळ विधानसभा क्षेत्राचाच विचार न करता संपूर्ण जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले.पावसाळ्याच्या तोंडावर काही रस्त्याचे आणि पुलाचे काम हाती घेतल्याने नागरिकांना थोडेफार अडचणींना सामोरे जावे लागले हे खरे असलेतरी विकास कामे झपाट्याने होत आहेत.अवघ्या काही कालावधीत अनेक विकास कामे पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण देखील आम्हीच करणार आहोत. त्यामुळे कधी घरातून बाहेर न पडलेले विरोधक आता घराबाहेर पडून रस्त्यावरील खड्ड्याबाबत बोलत आहेत.आता त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे उरले नाही. महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध लोक कल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा कल महायुतीकडे वळत आहे. त्यामुळे विरोधक हैराण झाले आहेत. असे बोलून त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनवले. एवढेच नव्हे तर मी आधीपासूनच सर्वसामान्य जनतेच्या सेवेत होतो,आहे आणि नेहमीच राहणार असेही ठणकावून सांगितले.
भव्य कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, तालुकाध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, सरपंच सपना कोडापे,कैलास कोरेत,सांबय्या करपेत सह आदी मान्यवरांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी जारावंडी, पेंढरी, कसनसूर, सेवारी, घोटसुर गुंडम सह आदी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*दुर्गम भागातील नागरिकांची समस्या जाणून घेतली*
जरावंडी येथील भव्य कार्यकर्ता मेळाव्याला दुर्गम भागातून आलेल्या नागरिकांशी आस्थेने संवाद साधून मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांची निवेदने स्वीकारत समस्या जाणून घेतली. यावेळी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे आणि गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे यांना पाचारण करून त्वरित नागरिकांची समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.यावेळी मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते परिसरातील लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ देण्यात आले.