*ज्येष्ठ नागरिकांनी वयोश्री चे नोंदणी करून ३ हजार रुपयांचा लाभ घ्यावा*
*आमदार डॉक्टर देवराव होळी*
*गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एमएलए कॅम्प च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शासकीय योजनांच्या लाभाची नोंदणी सुरू असल्याची दिली माहिती*
*दिनांक ३० ऑगस्ट गडचिरोली*
*शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा याकरिता राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील एम एल ए कॅम्प गडचिरोलीचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून संपुर्ण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मागील २० दिवसांपासून सुरू आहेत. या एमएलए कॅम्पच्या माध्यमातून ईमारत बांधकाम कामगार कल्याण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण , तीर्थ दर्शन योजना या योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्याचा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा मानस आहे. त्या करिता गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील अनेक मोठ्या गावांत या एमएलए कॅम्पचे आयोजन झाले असून उर्वरित प्रत्येक गावात या त्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ देवराव जी होळी यांनी दिली.*
. *या एम एल ए कॅम्प करिता गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये ५० कार्यकर्त्यांची टीम बनविण्यात आली आहे . मोठ मोठ्या गावात कॅम्पच्या माध्यमातून तर लहान गावामध्ये घरोघरी संपर्क करून शासन योजनांचे फॉर्म भरून जनतेला त्याचे लाभ मिळवून देण्याचा आपला प्रयत्न सूरू असल्याचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले. त्यामुळे जनतेने या योजनांचा लाभ घ्यावा व कॅम्प मध्ये सहभागी होऊन आपली नोंदणी करून घ्यावी. विशेषतः वयोश्री च्या माध्यमातून ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांनी आपली नोंदणी करून शासनाकडून मिळणाऱ्या ३ हजार रुपयाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी या माध्यमातुन केले आहे.*