*एटापल्लीत वनजमीन अतिक्रमणावर कारवाई,खरेदीदारांची झोप उडाली*

13

*एटापल्लीत वनजमीन अतिक्रमणावर कारवाई,खरेदीदारांची झोप उडाली*

 

*दुर्वाटोला येथील वनजमीन अतिक्रमण करून विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वन विभागाचा फटका*

 

दिनांक २८ आगस्ट २०२४ रोजी एटापल्ली येथील कक्ष क्रमांक ३४५ मध्ये एका अतिक्रमण कर्त्याने जवळपास २ हेक्टर वनजमीन अतिक्रमण केल्याची तक्रार वनविभाग परिक्षेत्र एटापल्ली ला मिळाली.

वनपरिक्षेत्र अधिकारी निलिमा खोब्रागडे यांनी तातडीने वरिष्ठांना कळवून २८ आगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अतिक्रमण काढण्यास सुरवात केली.

सदर जमीन ही एटापल्ली नगराला लागूनच आहे.

या जमिनीवर अतिक्रमण करून वनहक्कांचे दावे दाखविल्यानंतर सर्रास विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या कृत्याला वन विभागाने चाप लावली आहे.

घर पाडली,हद्दबंदी केली जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण करून बांधलेली घरे पाडण्यात आली आणि परिसरात हद्दबंदी करण्यात आली. या कारवाईमुळे वनहक्काचे दावे करून जमीन विक्री करणाऱ्यांची उमेद फुटली आहे.

 

खरेदीदारांची चिंता वाढली:

या कारवाईमुळे जमीन खरेदी करणाऱ्यांची झोप उडाली आहे. वन विभागाच्या या कठोर कारवाईमुळे भविष्यात अशा प्रकारचे गैरप्रकार होण्याची शक्यता कमी झाली आहे.

 

वन विभागाची संयुक्त कारवाई: भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेश मिना यांचे मार्गदर्शनात आणि वनपरिक्षेत्र अधिकारी निलीमा खोब्रागडे यांच्यासह वन विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई यशस्वी झाली.

 

प्रदीप गेडाम वनपाल,ज्ञानेश्वर कायते वनपाल,कन्नाके वनरक्षक,गावडे वनरक्षक, मडावी वनरक्षक,कुवर वनरक्षक, हेडो वनरक्षक,नैताम वनरक्षक,कोवासे वनरक्षक,अडगोपुलवार वनरक्षक,मज्जी वनरक्षक वनजमीन अतिक्रमण हटविण्यात उपस्थित होते.