भेंडाळा विश्वशांती विद्यालयात आनंददायी ‘ शनिवार ‘

27

भेंडाळा विश्वशांती विद्यालयात आनंददायी ‘ शनिवार ‘

चामोर्शी :

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भेंडाळा येथे शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी विविध उपक्रम राबविण्यात आले.सर्वप्रथम कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विध्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेचे संचालन ढगे मॅडम यांनी केले . कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रियंका बारसागडे,द्वितीय क्रमांक आरुषी सातपुते, तृतीय क्रमांक आर्या वैरागडे व खुशाल ठाकूर यांनी पटकावीला या विद्यार्थ्यांना बोरकर , घरत , चुधरी , पडगेलवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.या स्पर्धेनंतर सामूहिक रक्षाबंधणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या अंतर्गत विद्यार्थीनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव शाळेत साजरा केला. या नंतर सर्व शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी शाळेतील शिक्षिका व मुलींच्या संरक्षणाची शपथ घेतली. सदर कार्यक्रमाचे संचालन संतोष सुरावार यांनी केले तर कार्यक्रमाचा शेवट जी. डी. झाडे सर यांनी केला. सदर सर्व उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अरुण राऊत व पर्यवेक्षक एम. व्ही. जाधव यांच्या मार्गदर्शनात पार पडले.सदर उपक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.