*आधुनिक युगामध्ये महिलांनी स्वतःमधील कला-गुणांना वाव देवुन स्वतः ला प्रगत करावे.माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे*
*महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा,उमरेड जिल्हा नागपुर यांच्या वतीने श्रावण सोहळा २०२४ लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन.*
गडचिरोली:-दि.३१ ऑगष्ट
*प्रत्येक महिला हि स्वतःच्या कुटुंबासाठी,वडील धाऱ्यांची काळजी घेण्यासाठी सातत्याने लढत असते.महिलांनी संधी शोधा व त्या संधीचे रूपांतर सोन्यात करा.म्हणून महिलांनी प्रत्येक स्पर्धेत हिरहिरीने सहभाग घेवुन स्वतः मधील सुप्त कला-गुणांना समोर आणावे व त्या कलागुणांचा उपयोग करून आपल्या कुटुंबा सोबतच सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातामध्ये सामर्थ्यवान बनावे.याकरीता आधुनिक युगामध्ये महिलांनी स्वतः मधील कला गुणांना वाव देऊन स्वतः ला प्रगत करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा महिला आघाडी नागपुर विभाग उपाध्यक्ष,भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले.*
*महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा उमरेड,जिल्हा नागपुर यांच्या वतीने उमरेड येथिल प.दीनदयाल उपाध्याय नाटय सभागृह येथे श्रावण सोहळा २०२४ अनुषंगाने लोकनृत्य व एकलनृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन सौ.योगीताताई पिपरे उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.*
*याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार मा.राजुभाऊ पारवे यांच्या हस्ते पार पडले.तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा महिला आघाडी विदर्भ कार्याध्यक्ष मा.प्रज्ञाताई बडवाईक होते.तर प्रमुख अतिथी म्हणून किसान क्लब राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोरजी दंडारे,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपुर विभागीय अध्यक्ष जगदीशजी वैद्य,उमरेड पंचायत समिती सभापती गीतांजली नागभीडकर,कृष्णाई ज्वेलर्स संचालिका प्रफुल्ला गिरडकर,उमरेड प.स.गटनेते तथा म.प्रा.तै.महासभा युवा आघाडी नागपुर जिल्हाध्यक्ष पुष्कळजी डांगरे,सौ.संगीताताई पडोळे,उमरेड प.स.सदस्या जयश्री देशमुख, श्रीकृष्ण को-ऑफ.बँक संचालिका सुरेखा रेवतकर,संजय तळेकर, राकेश नौकरकर,रोशन चुटे, रोशन पाटील, महिला आघाडी विदर्भ संघटना माधुरीताई तलमले,युवा आघाडी नागपुर विभागीय सचिव संजय घुगूसकर उपस्थित होते.*
*याप्रसंगी उमरेड शहरातील तीन विध्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट रोजी अविरत १४ तास जलतरण करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली.या नव तरुणांचा पुष्पगुच्छ,शाल व सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. तसेच लोक नृत्य व एकलनृत्य स्पर्धेमध्ये सहभागी विजयी स्पर्धकांचा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व पारितोषिक देवुन बक्षीस वितरण करण्यात आले.*
*कार्यक्रमाचे आयोजन उमरेड महिला आघाडी अध्यक्षा गीताताई आगासे,अंकुश बेले,रोशन झोडे,मोहन बेले,नंदनी वासुरकर,प्रवीण गिरडे,आकाश लेंढे,मनीषा मुंगले,हरिश्चंद्र दागाने तथा उमरेड महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभाच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी यांनी केले.*