महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढत आहे. गीता हिंगे

19

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढत आहे. गीता हिंगे

दि. 30/08/2024

महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली स्थापित दिपज्योती लोकसंचालीत साधन केंद्र धानोरा अंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणं अभियान, महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती, जाणीव जागृती अभियान व वार्षिक सर्वसाधारण सभा, किसान भवन धानोरा येथे आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटक, मा. मिलिंद नरोटे सर सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली, कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता ताई झंझाळ, कोषाध्यक्ष cmrc धानोरा, विशेष अतिथी सौ. गीताताई हिंगे सामाजिक कार्यकर्त्या गडचिरोली, मा. अनिल पोहणकर सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली,श्रीमती सीमा ताई कन्नमवार सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली,श्रीमती लता ताई पुंघाटे सामाजिक कार्यकर्त्या धानोरा, मा. इंदिरा वाढई अद्यक्ष CMRC धानोरा मा. अनंत खरतकर GDCC बँक धानोरा, मा. जनबंधु सर आत्मा धानोरा. मा शेंडे मॅडम पशुवैदकीय विभाग धानोरा, मा. बुल्ले सर महिला बालविकास विभाग धानोरा. मा. करकाडे सर पोलीस स्टेशन धानोरा,मा. सोपानदेव म्हशाखेत्री वार्ताहर धानोरा, श्रीमती गुणवंता ताई उसेडी वनधन अध्यक्ष, देवला ताई कड्यामी cmrc सदस्य, कविता बोरकर, cmrc सदस्य, निराशा इंदूरकर दिपकांती कंपनी अद्यक्ष, अर्चना मोहुर्ले दीपक्रांती कपंनी सदस्य धानोरा. यांच्या प्रमुख उपस्तिथीत क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रजवलीत करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.त्यानंतर इतनी शक्ती हमे देना दाता, हि प्रार्थना घेन्यात आली. व उपस्थित मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

मा. मिलिंद नरोटे सर यांनी महिला सक्ष्मीकरन यावर मार्गदर्शन केले. व शासनाच्या विविध योजना दिपज्योती cmrc च्या माध्यमातून महिलापर्यंत पोचविण्याचे काम तालुक्यात अतिशय उत्कृष्ट रित्या करून महिला सक्ष्मीकरन करीत आहे. आणि शासनाच्या विविध उपक्रमात खुप मोलाचा वाटा आहे. आणि कोणत्याही आर्थिक बाबींची तरतूद नसतांना स्वप्रेरनेने महिला 40 किलोमिटर वरून आल्यात याबाबत खुप कौतुका केले. आणि मोह लाडू, आणि सुरु असणाऱ्या व्यवसाय विषयी सुद्धा त्यांनी आपल मत व्यक्त केले.

मा. गीता ताई हिंगे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महिलांच्या असणाऱ्या अडचणी व योजनेचा उदिष्टय यावर सखोल माहिती दिली.

मा. अनिल पोहणकर सर, यांनी लोकसंचालित साधन केंद्राअंतर्गत शासनाच्या विविध योजना आणि त्यामधून महिलांनी उभे केलेले छोटे मोठे व्यवसाय व आर्थिक उत्पन्नत झालेली आधीची आणि आता यामधील तफावत यावर अतिशय सखोल मार्गदर्शन केले.

मा.लता ताई पुंगाटे यांनी महिलांवर होणारी हिंसा व त्यातून होणारा त्रास, याबाबत माहिती दिली.

तसेच विविध विभागाचे समन्व्यक यांनी आपल्या विभागाअंतर्गत शासनाच्या विविध योजना. विषयी माहिती दिली.

यावेळी 42 गावांमधून 720 महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती रसिका मारगाये व्यवस्थापक cmrc धानोरा यांनी केले. संचालन लता उईके सहयोगिनी यांनी केले, आभार प्रदर्शन प्रतीक्षा शिंपी यांनी केले. कार्यक्रम यश्वितेसाठी पदमश्री चवदाणे, पौर्णिमा कोरेवार. सर्व cmrc प्रेरक, कार्यकारिणी, RGB व बचत गटातील संपूर्ण महिला यांनी मोलाचे सहकार्य केले.

उत्कृष्ट काम करणाऱ्या सहयोगिनी, प्रेरक, उधोग करणाऱ्या महिला , उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला, vlc यांना भेट वस्तू व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.