*भारतीय संविधान कुणीही बदलवू शकत नाही:-इंजि.प्रमोदजी पिपरे*

15

*भारतीय संविधान कुणीही बदलवू शकत नाही:-इंजि.प्रमोदजी पिपरे*

 

*बौद्ध समाज बांधव व आमदार डॉ.देवरावजी होळी मित्र परिवार यांच्या वतने बौद्ध समाज मेळावा*

 

*गडचिरोली:- दि.०१ ऑगष्ठ*

 

*वंचित समाजाला भाजपा विरुद्ध भडकविण्याचे काम अनेक जबाबदार लोक २००२ पासून सातत्याने करीत आहेत व देशातील तमाम भारतीयांच्या विशेषतः बहुसंख्य सामान्य जनतेचा केवळ राजकीय स्वार्थापोटी बुद्धीभेद करण्याचा व भाजपा विरुध्द भडकविण्याचे निकराचे प्रयत्न जीवाच्या आकांताने करीत आहेत.याउलट बेकायदेशीर व असंवैधानिक आणीबाणीच्या हुकुमशाही प्रधानमंत्री काळात इंदिरा गांधी यांनी 38 वी,39वी,व 42 वी घटनादुरुस्ती करून संविधानातील मुलभूत हक्क संपुष्टात आणुन संविधान व लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न इंदिरा गांधी यांनी केला.तर मोदी संविधान बदलनार म्हणून राहुल गांधी नौटंकी करीत आहे.काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नका,कारण भारतीय संविधान कुणीही बदलवू शकत नाही.राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व जातीधर्माच्या व विविध पक्षातील महिलांना १५०० रुपये प्रतिमाह सुरू केलेले आहेत.पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मा.पंतप्रधान यांनी सर्व जाती धर्माच्या व सर्व पक्षाच्या गरजु लोकांना घरकुल दिले.असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा निवडणूक प्रमुख इंजि.प्रमोदजी पिपरे यांनी केले.*

*स्थानिक आरमोरी रोडवरील गाणली सभागृह येथे बौद्ध समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवार यांच्या भव्य बौद्ध समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित बौद्ध समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.*

*यावेळी मंचावर आमदार डॉ. देवरावजी होळी,भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी बाळकृष्णजी बांबोळे, माजी प.स.उपसभापती विलासजी दशमुखे,माजी नगरसेविका लताताई लाटकर, निताताई उंदिरवाडे,गेडामताई,जनार्धनजी साखरे,सरपंचा बारसागडेताई,रामरतन गोहणे,राजू शेरकी, बौद्ध समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

*कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते देवाजी लाटकर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा.अरुण उराडे यांनी केले.*