चोप कोरेगाव परीसरातील कृषी विद्युत पंपाचे कनेक्शन कापणी मोहीम तात्काळ बंद करा
धानाची फसल निघेपर्यंत वीज पुरवठा कापणार नाही,महावितरण अधिकाऱ्यांचे आश्वासन
देसाईगंज :- तालुक्यातील चोप कोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना कृषी वीज पंपाचे वीज कनेक्शन कापणे बाबतची नोटीस देण्यात आले या नोटीस मूळे शेतकरी धास्तावले होते की यामुळे पेरणी केलेले धान पिकाचे नुकसान होईल, यावरून दि 28 फेब्रुवारी ला चोप येथील जागरूक शेतकऱ्यांनी माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल यांना पाचारण करून तोडगा काढावा अशी विनंती केली असता,शेतकऱ्यांचा असंतोष पाहून श्री चंदेल यांनी तात्काळ महावितरण चे उपअभियंता श्री साळवे यांचेशी दूरध्वनी द्वारे संपर्क करून शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज पुरवठा खंडित करू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला,यावरून श्री साळवे यांनी फसल निघे पर्यंत विद्युत पुरवठा खंडित करणार नाही असे आश्वासन दिले परंतु शेतकऱ्यांनी रनिंग बिल भरण्याची विनंती केली
यामुळे चिंतातुर शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे, याप्रसंगी शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम,कुरखेडा चे माजी सभापती पुंडलीक देशमुख, माजी तालुकाप्रमुख नंदू चावला,चोप चे सरपंच श्री नितीन लाडे,उपसरपंच प्रकाश डोंगरवार,तितिरमारे गुरुजी,निलेश्वर पार्वते,नेमा ठाकरे,मनोहर नाकाडे,पंढरी नाकाडे,मदनराव बनपूरकर व चोप परिसरातील शेतकरी उपस्थित होते।