राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याच्या घटनेचा तपास करून पुनर्स्थापना करण्यात यावी.- आदर्श एकता सामाजिक संघटनेची मागणी.

42

राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याच्या घटनेचा तपास करून पुनर्स्थापना करण्यात यावी.- आदर्श एकता सामाजिक संघटनेची मागणी.

 

अर्पित वाहाने वर्धा

 

स्थानिक आर्वी येथील आदर्श एकता सामाजिक संघटनाच्या वतीने सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अनेक स्तरांतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैचारिक भुमिकेतून 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाली. आणि अशा महान व्यक्तीमुळे आपले अस्तित्व आज कायम आहे. अशा महान व्यक्तीचा पुतळा मालवण या गावात कोसल्याने महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांना तडा गेलेला आहे. त्यामुळे सदर ठिकाणी त्यांच्या पुतळ्याची पुर्नःस्थापना करणे ही आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाची जबाबदारी असल्याकारणाने छत्रपती शिवजी महाराज यांच्या पुतळयाची पुर्नःस्थापना करणे अत्यंत गरजेचे व अगत्याचे आहे.

महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना दुखावल्याने व संपुर्ण जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील असल्याने तसेच त्यांच्या भावनेला तडा गेला असल्याने जनतेच्या भावनांचा आदर होण्याकरीता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने स्थापना करून सदर घटनेची खोलवर चौकशी करण्यात यावी. अशी मागणी आदर्श एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने करण्यात आली यावेळी उपविभागीय कार्यालय आर्वी च्या मार्फत श्री.एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना करण्यात आली आहे. यावेळी उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यासाठी आदर्श एकता सामाजिक संघटनेचे अध्यक्ष श्री गौतम अशोकराव कुंभारे, उपाध्यक्ष प्रा.अमर काशिनाथ भोगे, अमोल गोंडाने,विनोद सरोदे,आनंद दाहिर, अनिल तायडे,किसन रोहनकर,अजय ठाकुर,तेजस डोंगरे, अभिजित ढोकणे, इत्यादी सदस्य उपस्थित होते.