*आसिफ खान यांच्या उपोषणाची खासदार अमर काळे यांनी केली सांगता
दिनांक 2 / ०9 /२०२४ रोजी
वर्धा मुस्लिम धर्माचे धर्म गुरू मोहम्मद पैगंबर साहब यांच्या बाबतीत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह विधान करून मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या. या कारणाने राम गिरी महाराज यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्यात किमान 38 पोलिस तक्रारी दाखल झाल्या. या आधारे रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर सुध्दा त्यांना अटक न केल्यामुळे यांच्या अटकेच्या मागणी करीता ए.आय.एम.आय.एम. चे वर्धा शहराध्यक्ष तथा युवा नेते आसिफ खान दुपारी १२ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला मालारर्पण व अभिवादन करुन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली.
आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस सुरू असताना या उपोषणाची वर्धा जिल्हा खासदार अमर काळे यांनी दखल घेऊन उपोषण मंडपास भेट देऊन आसिफ खान यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली तसेच आसिफ खान यांच्या मागण्याच्या पूर्ततेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, खासदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन आसिफ खान यांनी खासदार अमर काळे यांच्या हस्ते ज्युस पिऊन उपोषणाची सांगता केली.
देशात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कार्यवाही झालीच पाहिजे, महाराष्ट्रतील हिंदु-मुस्लिम एक्य धोक्यात आणणारे रामगिरी महाराज सारखे व्यक्ती जाणीव पुर्वक असे वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण करत आहे, करिता जिल्हा पोलिस प्रशासनाला उपरोक्त रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अश्या सुचना खासदार अमर काळे यांनी दिल्या.
रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर आसिफ खान यांच्या समवेत मी खासदार अमर काळे पुन्हा उपोषणाला बसणार
असा इशारा प्रशासनाला दिला.
उपोषण मंडपात मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणत उपस्थित होते.