*बैलपोळा व तानापोळ्याचे औचित्य साधून आदर्श एकता सामाजिक संघटने तर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण.*

32

*बैलपोळा व तानापोळ्याचे औचित्य साधून आदर्श एकता सामाजिक संघटने तर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण.*

 

 

अर्पित वाहाणे

वर्धा

 

स्थानिक आर्वी गजानन महाराज मंदिर परिसर जाजूवाडी, स्वामी समर्थ उद्यान व शीतला माता मंदिर आर्वी येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाची सुरुवात गजानन महाराजांना वंदन करून करण्यात आली. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी आदर्श एकता सामाजिक संघटना महा. राज्य तर्फे वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या कार्यासाठी गावकरी सुद्धा प्रतिसाद देत आहे.या कार्क्रमला प्रमुख मा. सुरेंद्र चोचमकर,मा.कुटे साहेब,मा. मिलिंद पाईकराव,मा.अमोल गोरटे, मा.भावरावजी कालभूत, मा.दिपकराव इंगोले,मा.के. बी. दहातोंडे,बिट रक्षक हिवरा,मा.टी. गोराडे,बिट रक्षक सरांगपुरी उत्तर, मा.एस. पी. सावंत,बिट रक्षक पारगोठण,मा.डॉ. राजेश ठाकरे, मा.डॉ.अनिता ठाकरे,मा डॉ.वेदा ठाकरे,. मा.अरुणराव निंभोरकर, मा. साधना निंभोरकर, मा.शोभा जाधव,मा. संजू ठवळी, मा.गणेश पात्रे,मा.अश्विन जाधव,मा.दीपक चैनानी, मा.रावलानी व मंदिरातील सदस्य यांची उपस्थिती होती.हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील खोरगडे,अमोल गोंडाने , अविनाश गोंडाणे, शोभीत कुंभारे, आयुष गोंडाने, विराज हाडे यांनी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमाचे आयोजन गौतम अशोकराव कुंभारे अध्यक्ष आदर्श एकता सामाजिक संघटना महा. राज्य व संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्याची आर्वी विधानसभेतील नागरिकांनी स्तुती केली व सामाजिक कार्यक्रमात आम्हाला सहभागी करून घ्यावे अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी संघटनेतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.