*!_चामोर्शी येथे हिंदु संस्कृती जपत तान्हा पोळा उत्सव साजरा…मा.खा.अशोकजी नेते यांचे तान्हा पोळा उत्सवात उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन…._!*

22

*!_चामोर्शी येथे हिंदु संस्कृती जपत तान्हा पोळा उत्सव साजरा…मा.खा.अशोकजी नेते यांचे तान्हा पोळा उत्सवात उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन…._!*

 

*!वयोगट एक ते सहा चे प्रथम बक्षीस राजवीर चलकलवार यांनी पटकावले तर वयोगट सात ते चवदाचे प्रथम बक्षीस सानिध्य दुधबळे यांनी पटकावले!*

 

*दिं.०३ सप्टेंबर २०२४*

*चामोर्शी:-चामोर्शी शहरात तान्हा पोळा हा सण लहान बालगोपाल आप आपल्या लाकडी नंदीबैलाला सजवित बालगोपाल विविध वेशभूषेत नटवीत विविध सामाजिक प्रतिमा साकारत भव्य तान्हा पोळा उत्सव बाजार चौक नगरपंचायत समोर चामोर्शी दरवर्षीप्रमाणे थाटामाटात साजरा करण्यात आला.*

*या तान्हा पोळा उत्सवाचे उद्घाटन माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून फित कापून करण्यात आले.* *एसएमएस ऑर्केस्ट्रा ग्रुपचे वतीने महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली*

*या तान्हा पोळा उत्सवाला माजी खासदार अशोकजी नेते यांनी उद्घाटनप्रसंगी बोलतांना सांगितले चामोर्शी शहरात तान्हा पोळा हा उत्सव हिंदू संस्कृतीला जपत विविध पद्धतीने तान्हा नंदीबैल सजवित बालगोपालांनी आपली प्रतिमा विविध वेशभूषेत साकारून जसे बेटी बचाव,बेटी पढाओ, मुख्यमंत्री लाडकी बहीण, जय येळकोट मल्हार, शेतकरी असे अनेक वेशभूषीत साकारली त्यांचे कौतुक करतो व तान्हा पोळा हा सण अतिशय चांगल्या तऱ्हेने सामाजिक कार्यकर्ते अमोल आईचंवार , नगरसेवक आशिष पिपरे, रमेश अधिकारी, नगरसेविका प्रेमाताई आइंचवार व त्यांचे सहकाऱ्यांनी आयोजन केले* *त्यांचे अभिनंदन करत या उत्सवाला शुभेच्छा दिले व माझ्या कडून एक छोटीशी बालगोपालांना भेट देतोय !असे प्रतिपादन मा.खा.अशोकजी नेते यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.*

*वयोगट एक ते सहा चे प्रथम बक्षीस मानकरी राजवीर चलकलवार द्वितीय बक्षीस सत्यम ऐलावार यांनी पटकावले तर तृतीय बक्षीस दक्ष कागदेलवार यांनी पटकावले तर वयोगट एक ते सात चे प्रथम बक्षीस सानिध्य दूधबळे , द्वितीय बक्षीस विराज भिमनवार तृतीय बक्षीस गुणीत बंडावार यांनी पटकावले* *सर्व विजेत्यांना बक्षिसाचे प्रायोजक आशिष भाऊ पिपरे ,शुभम इंटरप्राईजेस, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी , कल्याणी ज्वेलर्स नगरसेविका सोनाली ताई पिपरे ,सुधीर जेट्टीवार, कवीश्वर सावकार आइंचवार यांचेकडून विजेत्यांना बक्षीस देण्यात आली या प्रसंगी मंचावर तालुका संघचालक किशोर ओल्लालवार, प्राचार्य डॉ,हिराजी बनपुरकर, आरपीआय चे ज्येष्ठ नेते माणिकजी तुरे, कार्यक्रमाचे आयोजक भाजपाचे नगरसेवक आशिषभाऊ पिपरे,सामाजिक कार्यकर्ते अमोलजी आईचवार, डॉ देवराव होळी यांची सहचारिणी सौ बिना ताई होळी,माजी न्यायाधीश दिक्षीत साहेब, नगरसेविका रोशनी वरघंटे, नगरसेविका सोनालीताई पिपरे, नगरसेविका प्रेमाताई आइंचवार,माजी जिल्हा परिषद सदस्या शिल्पा ताई रॉय पोलीस निरिक्षक कातबाने, कामगार आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, महिला मोर्चा च्या तालुकाध्यक्षा अनिता राँय,जिल्हा सचिव माधवी पेशट्टिवार, दिलीप चलाख, मास्टर प्रतीक राठी, प्रफुल भांडेकर, सुनील जुवारे , यशवंत त्रिकांडे ,विलास चीचघरे , सोमनकार बाबू , श्रावण सोनटक्के , बनपूरकर , ओमदास झरकर तुळशीदास नैताम व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते* *बालगोपालांचे प्रतिकृती परीक्षण श्रद्धा गंडाते सौ भारती तीतरे ,ओमप्रकाश साखरे गुरुजी संजय बंडावार गुरुजी यांनी केले भव्य तान्हा पोळा उत्सव कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केले या स्पर्धेत एकूण 150 स्पर्धक सहभागी झाले होते* *सहभागी सर्व स्पर्धकांना गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार अशोक भाऊ नेते यांचे कडून सहभागी सर्व स्पर्धकांना टिफिन बॉक्सचे वाटप करण्यात आले* *व गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ, देवराव होळी यांचे कडून प्रत्येक सहभागी स्पर्धकांना 500 रुपये प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले तसेच राजा गोपीचंद किराणा स्टोअर्स यांच्याकडून 100 स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आले तसेच मोठया संख्येनी शहरातील बहुसंख्य नागरिक बालगोपालांसह मोठया संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तान्हा पोळा उत्सव समिती पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केले*