*आशीर्वाद नगरात तान्हा पोळा – वर्ष २४ वे उत्साहात साजरा*

34

*आशीर्वाद नगरात तान्हा पोळा – वर्ष २४ वे उत्साहात साजरा*

 

दि.- ०३/०९/२०२४

 

भारत हा कृषिप्रधान देश, या देशाचा पोशिंदा बळीराजा, बळीराजाची संस्कृती व प्राणी मात्रंवरील प्रेम हा भविष्याच्या पिढीला आत्मसात व्हावे म्हणून या *तान्हापोळा* गावात , शहरात वेगवेगळ्या भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

त्याचाच एक भाग शहरातील आशिर्वाद नगर, चामोर्शी रोड येथे भरविण्यात येते

यावर्षी २४ वे वर्ष आयोजित करण्यात आलेल्या *तान्हापोळा* स्पर्धेच्या निमित्ताने चिमुकल्यांनी आपापल्या नंदीबैलांना घेऊन प्रचंड गर्दी केली होती.

पोळ्यात सहभागी झालेल्या चिमुकल्यांचा उत्साह अगदीच ओसांडून वाहत होता. त्यांना घेऊन आलेले पालक तसेच बघे म्हणून आलेले नागरिक या चिमुकल्यांच्या सजावटीची तसेच तब्बल तीन चार फूट उंचीच्या बैलांची प्रशंसा करीत होते.

 

यावेळी स्वामी समर्थ यांची प्रतिमा साकारणारी वेशभूषा तसेच भगवान शंकर यांची प्रतिमा असलेली प्रतिकृती या पोळ्याचे विशेष आकर्षण ठरले.

तसेच लहान नंदी पासून ते तब्बल चार ते पाच फूट उंच असलेले नंदीही या पोळ्याचे आकर्षण ठरले, तसेच सध्या महाराष्ट्रात सुरू असलेली “लाडकी बहीण योजना” याची प्रतिकृती साकारलेले चिमुकलेही आकर्षणाचा भाग ठरली.

तसेच वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा आणि केशभूषा करून आलेले बालगोपाल आणि त्यांचे निरनिराळे सजावट करून आणलेले नंदीबैल नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. कुणी शेतकऱ्यांची, तर कोणी सध्या सुरू असलेल्या डॉ. मोमिता यांच्या विषयीची तसेच मुलींच्या आत्मसंरक्षणाची तसेच कोणी भगवान शंकर तसेच कोणी महाराष्ट्रीयन परंपरा जपणारी तसेच आकर्षक वेशभूषा करून आकर्षक रित्या सजविण्यात आलेल्या आपल्या नंदीबैलाला घेऊन या तान्ह्यापोळ्यात सहभागी झाले होते.

 

यावेळी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणजेच गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार मा. नामदेवराव किरसान, तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम, तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मिलिंद नरोटे, तसेच भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, तसेच काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, तसेच शिवसेना (उबाठा गट) जिल्हाध्यक्ष राजेश कात्रटवार, सुमित्रा आत्राम, विश्वजित कोवासे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नंदी सजावट व आकर्षक वेशभूषा साकारणाऱ्या सुरुवातीच्या चार विजेत्यांना रोख रक्कम व सायकल भेट देण्यात आली. नंदी सजावट:

१.अश्वित प्रवीण रक्षमवार

२.स्वर्णिका सुरेश शेंडे

३.विश्वत विजय वाघुळकर

४.शौर्य वाहाने

 

वेशभुषा:

१.त्रिषा येनप्रेड्डीवार

२.आधिक्य वरगांटीवार

३.मायरा भडके

४.ओवी धकाते तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक चिमुकल्यांना आकर्षक भेटवस्तू व खाऊ देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिलभाऊ तिडके तसेच या कार्यक्रमाचे आयोजन रविभाऊ मेश्राम, संजय बारापात्रे, मंगेश रणदिवे, प्रवीण रक्षमवार यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाला नागरिकांनी उत्सुर्फ प्रतिसाद दिला तसेच जनतेचा महासागर याठिकाणी उसळला होता.