*काँग्रेसच्या वतीने आष्टी येथे निषेध आंदोलन*

16

*काँग्रेसच्या वतीने आष्टी येथे निषेध आंदोलन*

 

*’फक्त सिमेंट मधे जान असून चालत नाही तर तुमचा इमान पण जिवंत असला पाहिजे’ – डॉ.सोनलताई कोवे*

दिनांक ०३/०९/२०२४ रोजी मौजा आष्टी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पन करून काँग्रेसच्या वतीने मालवण येथील ८ महिन्या पूर्वी उद्घाटन झालेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनेचा निषेधार्थ सत्ताधाऱ्यांविरूद्ध आंदोलन करण्यात आले. यावेळी जनतेचा तसेच जनसामान्याचा आक्रोश उफाळून आला होता.

महाराजांचे ३०० वर्षा पूर्वीचे गड- किल्ले मोठ्या दिमाखात ऊन-वारा-पावसात तटस्थ उभे आहेत आणि अवघ्या ८ महिन्याचा कालावधीतच पुतळा कोसळतो कसा? फक्त सिमेंट मधे जान असून चालत नाही तर तुमचा इमान सुद्धा जिवंत असला पाहिजे, जर सरकारच्या इमान जिवंत असता तर कदाचित आज ही दुर्घटना घडली नसती आणि महाराष्ट्राला आणि समस्त शिवभक्तांना हा दिवस बघन्याचा दुर्देव नशीबी आला नसता. अशाप्रकारे छत्रापतींचा अवमान करण्याचा धाडस किंवा त्यांच्या छविला बोट जरी लावण्याचा विचार केला तर आम्ही शिवभक्त शांत बसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड बांधणीची जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांच्याकडे दिली होती. ज्यावेळी रायगड बांधून पूर्ण झाला तेव्हा गडाची उत्कृष्ट आणि भव्य बांधणी जी एखाद्या सिव्हिल इंजिनियर ला ही लाजवेल असे बांधकाम कौशल्य बघून महाराज खुश झाले आणि त्यांनी हिरोजींना सांगितले की तू तुला जे हवे ते मागू शकतोस तेव्हा हिरोजींनी मागून पण काय मागितले त्यांनी मागितले की, “रायगडाच्या एका पायरीवर माझे नाव लिहिलेले असावे जेणेकरून आपले चरण त्या पायरीवर पडतील आणि मी धन्य होईन”. ही पायरी गडावरील जगदीश्वर मंदिराजवळ आहे. त्यावर लिहिले आहे, “सेवेशी ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर” याचा अर्थ असा होतो की “हिरोजी इंदुलकर महाराजांच्या सदैव तत्पर सेवेमध्येच असेल”. यातून हिरोजींचे महाराजांवरील निष्ठा आणि निस्सीम प्रेम दिसून येते पण ह्या सरकारच्या म्हणात महाराजांबद्दलची निष्ठा उरलेली नाही याचा मी जाहीर निषेध करतो तसेच वाढत्या महिला आत्याचारा बद्दल रोष प्रकट करून काँग्रेस कार्यकर्त्या डॉ.सोनलताई कोवे यांनी निषेध व्यक्त केला.

यावेळी मा. खासदार नामदेव किरसान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, डॉ.सोनल ताई कोवे, मनोहर पोरेटी, विश्वजीत कोवासे, राजेश ठाकूर, प्रमोद भगत, कमलाताई ब्राह्मणवाडे, विनोद येलमुले, शंकर आक्रेड्डीवर, पंकज पसपुलवर, आनंद कांबळे, सूरज कुकुडकर व आष्टी परिसरातील काँग्रेस चे कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.

 

*-डॉ.सोनलताई कोवे*

काँग्रेस कार्यकर्त्या, गडचिरोली विधानसभा क्षेत्र.