*लांजेडा,इंदिरानगर व रामनगर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा*

34

*लांजेडा,इंदिरानगर व रामनगर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा*

 

*भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे व पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस संचालक इंजि. अनुरागजी पिपरे यांच्याकडून सर्व बाल गोपालांना उत्कृष्ट बक्षीस व खाऊचे वाटप*

 

*उपस्थित बालगोपालांना दिल्या तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा*

 

*दिनांक १५ सप्टेंबर २०२४ गडचिरोली*

 

*स्थानिक लांजेडा, इंदिरानगर व रामनगर येथे तान्हा पोळा सणानिमित्त नंदीबैल एकत्रीकरण व सजावट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे व पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस चे संचालक इंजि.अनुरागजी पिपरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान शंकराचे पूजन व आरती करुन करण्यात आली. प्रसाद वितरण व त्यानंतर नंदीबैलांचे निरीक्षण करण्यात आले.माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्याकडून सर्व बाल गोपालांना सामूहिक बक्षीस व खाऊचे वाटप करण्यात आले. बक्षीस वितरणानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.*