शेतकऱ्यांच्या घामाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी जयश्रीताईला येणाऱ्या निवडणूकीत संधी द्या 

26

 

शेतकऱ्यांच्या घामाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी जयश्रीताईला येणाऱ्या निवडणूकीत संधी द्या

 

कार्यकर्ता मेळाव्यात आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांचे आवाहन

 

गडचिरोली : मोठ्या व्यापाऱ्यांचे हित बघणाऱ्या सरकारांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभावा पासून वंचीत ठेवले आहे. यामुळे शेती कसणे कठीण झाले आहे. १९४८ पासून हमीभावाचा लढा लढणाऱ्या शेतकरी कामगार पक्ष धान उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देण्यासाठी सक्षम आहे, त्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत खटाऱ्याला मोठ्या संख्येने मतदान करुन जयश्रीताई जराते यांना संधी द्या, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केले.

 

शुक्रवारला तालुक्यातील मौजा गुरवळा येथे शेतकरी कामगार पक्षातर्फे येवली – मुडझा जिल्हा परिषद क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या माध्यमातून जयश्रीताईंच्या प्रचार अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन भाई रामदास जराते बोलत होते. ते पुढे म्हणाले, केवळ निवडणूक आली म्हणून जयश्रीताई गावांमध्ये फिरत आहे असे नसून ती मागील पंधरा वर्षांपासून चळवळीत सक्रीय आहे. त्यापोटी अनेक पोलीस केसेस अंगावर घेवून समाजासाठी काम करीत आहे. फोटोबाज आणि दारुड्यांना मोठे करुन विधानसभा क्षेत्राचे नुकसान करण्यापेक्षा सामाजिक जाणीव असणाऱ्या जयश्रीताईला संधी दिल्यास शेतकरी कामगार पक्ष जनतेचा कधीच विश्वासघात करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

मेळाव्याचे उद्घाटक म्हणून गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या उमेदवार जयश्रीताई जराते, सहउद्घाटक काॅ. अमोल मारकवार, प्रमुख अतिथी म्हणून रायगडचे अंकीत भानुशाली, भाई शामसुंदर उराडे, डाॅ. गुरुदास सेमस्कर, तुळशिदास भैसारे, अक्षय कोसनकर, महिला जिल्हाध्यक्ष कविता ठाकरे, युवक जिल्हाध्यक्ष गुड्डू हुलके, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अभिलाषा मंडोगडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शोएब पटेल, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबनवाडे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष रामदास आलाम, भटके – विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष शर्मिश वासनिक, गुरवळाच्या सरपंच जया मंटकवार, माजी सरपंच निशा आयतुलवार, पोर्णिमा खेवले, पोर्णिमा रमेश गेडाम, मोरेश्वर शेंडे, विजय भोयर, बालाजी भोयर, सुधाकर जराते, लक्ष्मण शेंडे, खुशाल मेश्राम, मारोती कांबळे, विलास जराते, अविनाश कोहळे, चंद्रकांत भोयर, गुरवळा गाव शाखा चिटणीस विलास अडेंगवार, रमेश ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

मेळाव्या दरम्यान भाई रामदास जराते आणि जयश्रीताई जराते यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या ढिवर मोहल्ला सुधार प्रकल्पा अंतर्गत घरकुलांचे भव्य रॅली काढून भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी पोलीस भरती, गुणवंत विद्यार्थी व घरकुल लाभार्थ्यांना स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

 

मेळाव्याचे प्रास्ताविक आणि संचालन विनोद मेश्राम यांनी केले. प्रदिप मेश्राम, डंबाजी मेश्राम, श्रीधर मेश्राम, चरणदास भोयर, अतुल मंटकवार, हरिदास भोयर, अजय मेश्राम, नरेश घुटेवार, माणिक गावळे, अविनाश अडेंगवार, पांडुरंग शेंडे, शुभम तुनकलवार, देविदास अडेंगवार, रंजित गेडाम, जगदिश मेश्राम, पुरुषोत्तम शेंडे, नरेश शेंडे, होमराज तुनकलवार, शुभम मेश्राम, भूपेश शेंडे, पुरुषोत्तम अडेंगवार, बळीराम तुनकलवार, गजानन अडेंगवार, प्रभाकर बंडावार, दत्तू शेंडे, प्रदिप तुनकलवार, तेजस तुनकलवार, रोशन भोयर, विशाल गेडाम, रोशन मेश्राम, पंकज मेश्राम, बच्चन गेडाम, समीर शेंडे, भगवान गेडाम, बापूजी मेश्राम, नामदेव चिचघरे, जोगेश्वर तुनकलवार, आकाश कोमलवार, देविदास फाफनवाडे, हरिदास शिडाम, डंबाजी भोयर, बालाजी मोहुर्ले, चिरंजीव अडेंगवार, हिमेश अडेंगवार यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.