जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुन्नुर पंचायत समिती एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शालेय स्वयंशासन हा उपक्रम

10

दिनांक 05/09/2024 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुन्नुर पंचायत समिती एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शालेय स्वयंशासन हा उपक्रम घेण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई अशा विविध भूमिकेतून शालेय प्रशासन सांभाळत हा उपक्रम पूर्ण केला.

जिल्हा मुख्यालयापासुन 170 किमी व तालुका मुख्यालयापासुन 35 किमी दूर असलेल्या अतिदुर्गम आदिवासी अशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुन्नुर या शाळेतील विद्यार्थ्यांकडून हा नविन उपक्रम राबविण्यात मुख्याध्यापक श्री न.वा.परशुरामकर व सहाय्यक शिक्षिका कु.अनुपमा ओगेवार मॅडम यांच्या अथक परिश्रमातून शक्य झाले आहे.

याप्रसंगी उपस्थित केंद्र प्रमुख श्री अविनाश बारसागडे सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री टिबरु गावडे तथा उपस्थित ग्रामस्थांनीही या उपक्रमाला शुभेच्छा देत शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक केले.