लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी केली रामाळाच्या रक्षणार्थ मानवी साखळी’

116

लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी केली रामाळाच्या रक्षणार्थ मानवी साखळी’

आजही शहरातील संघटना, राजकीय पदाधिका-र्यांनी उपोषण मंङपाला भेट देत पाठिंबा दिला.

 

चंद्रपूर/प्रतिनिधी
इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आठव्या दिवशी लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी एकत्रित येत रामाला तलाव वाचविण्यासाठी ‘मानवी साखळी’ तयार केली.

रामाला तलाव संवर्धन करिता सुरू असलेल्या बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास आपले समर्थन जाहीर करीत घोषणा दिल्या. आज उपोषणाचा आठवा दिवस आहे. यावेळेस विद्यार्थिनींनी रामाळा तलावाचे प्रदूषण आणि भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली.
आजही शहरातील संघटना, राजकीय पदाधिका-र्यांनी उपोषण मंङपाला भेट देत पाठिंबा दिला. यात युवा चेतना मंच, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सीटी चंद्रपूर, ज्ञानदा शिक्षण संस्था, पर्यावरण मंच, नुटा चंद्रपूर युनिट, बुध्दिस्ट वुमेन्स फाऊंडेशन, गुरू रविदास फाऊंडेशन, श्री वेदमाता गायत्री ट्रस्ट, श्री माता कन्यका बगिचा ग्रूप, संस्कार भारती, विकलांग सेवा संस्था, माहिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेना आदींसह
तिरवंजा ग्रामपंचायत उपसरपंच प्रशांत कोपूला यांनी पाठिंबा दिला.