राणी दुर्गावती विद्यालय आलपल्ली येथे शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

35

राणी दुर्गावती विद्यालय आलपल्ली येथे शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

आज दि. 5सप्टेंबर 2024ला राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली येथे शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात वर्ग 8वी चे तीन विद्यार्थी शिक्षक तर दोन चपराशी आणि बाकी सर्व संपूर्ण शाळेतून विद्यार्थिनींचसहभागी होत्या. सर्व नवोदित शिक्षकांनी अगदी आनंदाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात अध्यापनाचे कार्य पार पाडले. या कार्यक्रमासाठी सिमरन खोब्रागडे ही मुख्याध्यापिका बनली. तर तिच्या हाताखाली 59 शिक्षिका3शिक्षक 2चपाराशी यांनी आजचे कामकाज सांभाळले. या कार्यक्रमासाठी मा. *पंदीलवार* मॅडम, तसेच मा.पहापळे सर आणि मा.सीलमवार सर यांनी पूर्व नियोजन करून सहकार्य केले. त्याचप्रमाणे नवीन अध्यापकांच्या,अध्यापिकांच्या अध्यापनाचे परीक्षण मा. मावलीकर सर, तसेच कु. धाबेकर मॅडम, भिमनपल्लीवर मॅडम, आणि निकेसर मॅडम यांनी आपला अमूल्य वेळ देऊन केले. हा कार्यक्रम राणी दुर्गावती विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय जी एस लोणबले सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांचाही सहभाग लाभला.

यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचा कार्यक्रम शाळेमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली चे स. मा. मुख्याध्यापक जी. एस लोणबाळे सर यांनी अध्यक्ष पद भूषवले तर शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका माननीय कश्यप मॅडम यांनी प्रमुख अतिथी चे स्थान स्वीकारले. त्याचबरोबर कार्यक्रमास कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून डी एन गोबाडे सर यांनी स्थान भूषवले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी रोहित मुक्कावार यांनी सुद्धा आपले स्थान स्वीकारले. सर्वप्रथम माता सरस्वती सावित्रीबाई फुले आणिराधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर अतिथींच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला. कुमारी धाबेकर मॅडम यांनी प्रास्ताविका मध्ये अनेक उदाहरणे देऊन गुरुचे महत्व पटवून दिले. तसेच मा. मावलीकर सर यांनी सुद्धा गुरु बद्दल आदर नेहमीच असावा असे आपल्या प्रस्ताविकात सांगितले.यानंतर विद्यार्थिनींनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. कुमारी जानवी मारकवार इयत्ता दहावी दिव्या भनारे इयत्ता दहावी. रिया हलदर इयत्ता नववी हर्षाली चरडूके इयत्ता आठवी. आणि सांगितले की शिक्षक बनणं हे किती कठीण असते. कितीही कठीण परिस्थिती असली तरी आमच्या शिक्षक दररोज शाळेत उपस्थित असतात आणि आम्ही कितीही गोंधळ केला तरी ते हसत हसतच आम्हाला शिकवतात. कधी कुंचल्याचे घाव घालतात तर कधी प्रेमाने कुरवाळत आम्हाला ज्ञानाचे धडे देत असतात. म्हणूनच आम्ही घडतो. गुरुविण मार्ग नसे. अगदी वेळेवर का होईना पण मनात जे येईल ते मनोगत मुलींनी आज व्यक्त केले आणि जीवनातील गुरुचे महत्व पटवून सांगितले.

या कार्यक्रमाचे संचालन मा. गुरनुले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. गोवांशी मॅडम यांनी केले.या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.