*मा.खा.अशोकजी नेते यांनी गडचिरोली शहरातील विविध ठिकाणच्या घरगुती गणपती बाप्पाचे घेतले दर्शन

13

*मा.खा.अशोकजी नेते यांनी गडचिरोली शहरातील विविध ठिकाणच्या घरगुती गणपती बाप्पाचे घेतले दर्शन …..*

 

दिं.०८ सप्टेंबर २०२४

 

गडचिरोली शहरातील विविध ठिकाणच्या घरगुती गणपती बाप्पाचे आज (दि.०८ सप्टेंबर)रोजी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी गणपती बाप्पा मोरया चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले..

 

यावेळी शहरातील प्रतिष्ठित तथा भाजपाचे जेष्ठ गजाननराव येनगंदलवार,माजी सभापती तथा जिल्हा सचिव रंजिताताई कोडापे,साई सिल्लमवार, प्रफुल्ल भाऊ बिजवे,चंद्रकांत देवेकर,सामाजिक नेते कुणाल पेंदोरकर,प्रविण भाऊ चन्नावार, भाजपा नेते संजयजी बारापात्रे, युवा नेते मंगेश भाऊ रणदिवे इत्यादी यांच्या घरी श्री.गणेशजी प्रतिष्ठापना केलेली होती या निमित्ताने मा.खा.नेते यांनी दर्शन घेत गणपती बाप्पा सर्वांना सुख, समृद्धी,ऐश्वर्य ,शांती,आरोग्य देवो हीच बाप्पाच्या चरणी नतमस्तक मनोकामना करत प्रार्थना केली..

 

याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपाचे अविनाश विश्रोजवार, आशिष कोडापे, रुषिकेश बारापात्रे, खुशालजी पेंदोरकर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.