*_गडचिरोली -आरमोरी या रस्त्याची दुरूस्ती तातडीने करण्यासंबंधी मा.खा.अशोकजी नेते यांची जिल्हाधिकारी मान.संजयजी दैने यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…._*

43

*_गडचिरोली -आरमोरी या रस्त्याची दुरूस्ती तातडीने करण्यासंबंधी मा.खा.अशोकजी नेते यांची जिल्हाधिकारी मान.संजयजी दैने यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…._*

 

*_चामोर्शी हरणघाट मुल याही रस्त्याची दुरुस्ती व कोनसरी प्लांट च्या समस्या संबंधी सुद्धा चर्चा…._*

 

*_मा.खा.नेते यांनी गाडीवरून उतरून रस्त्याची केली पाहणी.._*.

 

दिं.०९ सप्टेंबर २०२४

 

गडचिरोली :- आरमोरी – गडचिरोली या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनिय झाली असुन अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने प्रवाशांना त्यावरून वाहण चालविणे अत्यंत त्रासदायक झाले आहे. रस्त्याची एवढी दुरवस्था झाली आहे की रस्त्यावर खड्डे आहेत की खड्यात रस्ता आहे हे समजने फारच कठीण आहे.यासाठी मा.खा.नेते यांनी गाडी वरून उतरून रस्त्याची थेट पाहणी केली.

 

यासाठी मा.खा.नेते यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत दरवर्षी या रस्त्याची डागडुगी केली जाते मात्र नंतर त्याचे खड्यात रूपांतर होते. यावर कायमचा उपाय करण्याचे अत्यंत आवश्यक आहे.

 

गडचिरोली-नागपूर महामार्गावर असल्याचे हा रस्ता सर्वात वर्दळीचा आहे आणि लोक मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर करतात. गडचिरोली हे मुख्यालयाचे ठिकाण असून रेफर रुग्ण गडचिरोली वरून नागपुर ला दवाखान्यात नेण्यासाठी व गर्भवती महीला. विद्यार्थी, शेतकरी आदीसह हजारो लोकांना रोजच्या कामानिमीत्य या रस्त्यावरूण प्रवास करावा लागतो.यासाठी आरमोरी- गडचिरोली NH 353C या रस्त्याची दुरूस्तीचे आदेश संबंधीत विभागाला तातडीने द्यावे. या करीता माजी खासदार तथा ‌राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी जिल्हाधिकारी मान. संजयजी दैने यांना निवेदनाद्वारे मागणी करत चर्चा केली.

तसेच

चामोर्शी हरणघाट मुल क्र. 378C हा राज्य मार्ग चंद्रपूर-गडचिरोली राजनांदगाव महामार्ग क्र. 930 आणि साकोली गडचिरोली – सिरोंचा महामार्ग क्र. 353C चामोर्शीला जोडतो. चामोर्शी ते मुल 27 कि.मी अंतर राज्य महामार्ग आहे. या राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये केल्यास दोन्ही महामार्ग जोडल्या जाऊन परिसराचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो अशी मागणी मी. मा. श्री. नितीनजी गडकरीं यांना केली आहे.

 

हरणघाट-चामोर्शी या 18 किमी लांबीच्या रस्त्यावर हरणघाट दोटकुली नाल्यापर्यंत ते भेंडाळा विज पाँवर स्टेशनपर्यंत तर डांबरप्लॉन्ट ते दहेगावपर्यंत जागोजागी मोठे खड्डे पडले असुन दहेगांव अंगणवाडी समोर दोन मोठे खड्डे पडले आहे या खड्यातुन वाट कशी काढावी या विवचनेत वाहनधारक सापडले आहे. चामोर्शी ते डांबरप्लॉन्ट पर्यंत वाहन कसे चालवावे ही मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

 

चामोर्शी हरणघाट – मुल या रस्त्याचे निविदा होवुन खुप दिवस झाले आहे परंतु संबंधीत कंत्राटदारानी कामाची सुरवात अतिशय संथगतीने सुरू केली आहे. करीता संबंधीत ठेकेदारावर दंड ठोकुण उचित कार्यवाही करावी.

व चामोर्शी हरणघाट मुल या रस्त्याचे काम लवकर करावे.तसेच कोनसरी प्लांट च्या विविध समस्या संबंधीत सुद्धा यावेळी मा.खा.नेते यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली.