*श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ बस स्थानक एटापल्ली येथे जागतिक प्रथमोपचार दिवस साजरा*

12

*श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ बस स्थानक एटापल्ली येथे जागतिक प्रथमोपचार दिवस साजरा*

 

दिनांक ०९/०९/२०२४ रोजी श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ बस स्थानक एटापल्ली येथे मंडळात वैद्यकीय प्रथमोपचार पेटी लावून जागतिक प्रथमोपचार दिवस साजरा करण्यात आले. दैनंदिन जीवनातील संकटाच्या परिस्थितीत प्रथमोपचाराद्वारे लोकांना कशी मदत करावी याबद्दल लोकांना जागरूक करणे हा या दिवसाचा उद्देश होता. या निमित्ताने प्रथमोपचाराचे फायदे, प्रथमोपचाराची गरज आणि घरी प्रथमोपचार पेटी ठेवणे याबाबत लोकांना जागरूक केले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राघवेंद्र सुल्वावार, सदस्य सर्वश्री रोहित बोमकंटीवार, तनुज बल्लेवार, सुमित नाडमवार, अभिजित नागुलवार उपस्तीत होते.

 

*प्रथमोपचार म्हणजे काय?*

आपल्याला प्रथमोपचारासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असू शकते हे समजून घेणे आवश्यक आहे.जेणेकरून आपण त्वरित प्रथमोपचार प्रदान करू शकाल. प्रथमोपचार म्हणजे आजारी आणि जखमी व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळण्याआधी दिलेला उपचार. यासाठी तुमच्या फर्स्ट एड बॉक्समध्ये काही गोष्टी असाव्यात. जसे तुमच्याकडे डेटॉल असावे, जेणेकरून जखम साफ करता येईल. कापूस आणि पट्टी देखील आपल्या बॉक्समध्ये ठेवली पाहिजे. कात्री, वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेली क्रीम, हँड सॅनिटायझर, वेदनाशामक औषधे देखील असावीत. हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक झाल्यास रुग्णाचे रक्त पातळ करता यावे म्हणून ऍस्पिरिनच्या गोळ्या आणि थर्मामीटर इ. देखील असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमच्याकडे हॉस्पिटलचा इमर्जन्सी फोन नंबरही असायला हवा.