वयोवृद्ध आणि 45 वर्षे वय पूर्ण असणाऱ्या कोमॉर्बिड व्यक्तींना कोविड लसीकरण

145

वयोवृद्ध आणि 45 वर्षे वय पूर्ण असणाऱ्या कोमॉर्बिड व्यक्तींना कोविड लसीकरण

ऑनलाईन नोंदणी करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

कोविड लसीकरणासाठी गडचिरोली जिल्हयात सर्व तालुके मिळून १४ ठिकाणी शासकीय रूग्णालयात मोफत कोविड लसीकरण सुरू आहे.

गडचिरोली, दि.०१ मे (जिमाका) : – वय वर्षे ६० पुर्ण असलेल्या तसेच ४५ वर्ष पुर्ण वय असलेले आजारी कोमॉर्बिड व्यक्तींना आता तिसऱ्या टप्यायपत कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या selfregistration.cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून त्यांना आपल्या पसंतीच्या वेळेवर व पसंतीच्या कोविड लसीकरण केंद्रावर लस घेता येणार आहे. ही पध्दत अतिशय सोपी असून संबंधित व्यक्तीच्या घरातील इतर कोणीही ही प्रक्रिया पुर्ण आपल्या घरातील वयोवृद्ध किंवा 45 वय पूर्ण असणाऱ्या कोमॉर्बिड व्यक्तींची नोंद selfregistration.cowin.gov.in या संकेतस्थळावर करू शकतो. एक व्यक्ती रजिसटर झाल्यावर इतर पात्र तिघांची नावे नोंद करू शकतो. या संकेतस्थळावर जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करावी असे आवाहन आरोग्य विभाग गडचिरोली द्वारे करण्यात आले आहे.

कोविड लसीकरणासाठी गडचिरोली जिल्हयात सर्व तालुके मिळून १४ ठिकाणी शासकीय रूग्णालयात मोफत कोविड लसीकरण सुरू आहे. तसेच खाजगी दोन ठिकाणी दि.०१ मार्च पासून रूपये २५०/- एवढया किंमतीत लसीकरण सुरू केले आहे. शासकीय सर्व दवाखाने व खाजगी मध्ये धन्वंतरी हॉस्पिटल, गडचिरोली व सिटी हॉस्पिटल गडचिरोली येथे केंद्र आहेत.

कोरोना लसीकरणासाठी आवश्यक कागदपत्र : – १) मोबाई नंबर २) आधार किंवा इतर विहीत ओळखपत्र (ज्यावर ओळखपत्र क्रमांक असेल) ते तुम्हाला लसीकरणावेळी सादर करावे लागेल. ३) वय वर्ष ४५ ते ५९ मधील आजारी कोमॉर्बिड व्यक्तींना त्यांचे आरोग्य प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

नोंदणी करण्यासाठीची प्रक्रिया :- ऑनलाईन स्वरूपात नोंदणीसाठी selfregistration.cowin.gov.in या संकेत स्थळावर गेल्यावर आपला विहित मोबाईल क्रमांक टाकावा. त्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाकल्यावर आपला मोबाईल नोंदणीसाठी रजिस्टर होईल. पुढे ओळखपत्र क्रमांक, नाव, लिंग व जन्म साल टाकावे. जर आपण आजारी कोमॉर्बिड असाल तर त्याखाली होय या बटनावर क्लीक करावे व नोंदणी करावी. त्यानंतर आकाऊंट डीटेल्स मध्ये जावून लसीकरण घेणाऱ्या नागरिकांची जास्तात जास्त एकूण ४ लोकांची माहिती भरून नोंदणी करता येईल. यामध्ये एक किंवा एकूण ४ पर्यंत कितीही नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. तसेच केलेल्या नोंदणीमधील नावे पुन्हा नको असल्यास वगळता येतील. ती दुरूस्तही करता येतील. या प्रक्रियेत आपणाला पासवर्ड तसेच मोबाईल नंबरने लॉगइन सुद्ध करता येईल.
ही प्रक्रिया पुर्ण झाल्यावर पासवर्ड तसेच मोबाईल नंबरने लॉगइन करून उपलब्ध लसीकरण दिनांक व केंद्राची निवड करावी लागेल. आपले राज्य, जिल्हा, तालुका व पिनकोड टाकून माहिती निवडावी. नोंदणी पुर्ण झाल्यावर आपल्या मोबाईल नंबरवर नोंदणी पुर्ण झाल्याचा संदेश मिळेल. एकदा नोंदणी पुर्ण झाली की लसीकरणाचा दिवस सोडून कधीही आपणाला लसीकरणाच्या दिवसात बदल करता येईल. याठी पुन्हा selfregistration.cowin.gov.in या संकेत स्थळावर लॉगईन करावे.

आजारी कोमॉर्बिड व्यक्तींमध्ये कोण कोण असू शकते : – वय वर्ष ४५ ते ५९ मधील असे व्यक्ती जे ह्रयदयरूग्ण आहेत ज्यांनी मागील एक वर्षात दवाखान्यात उपचार घेतले आहेत. तसेच ज्यांच्या ह्यदयाची सर्जरी झाली आहे असे. उच्च रक्तदाब, डायबेटीक रूग्ण, किडणी तसेच लीवर बाबत आजरी असलेले, कॅन्सरग्रस्त, सिकल सेल ग्रस्त, एसआयव्ही बाधित तसेच आरोग्य विभागाने प्रमाणित केले इतर आजार. याबाबत त्यांना आपला आजार असलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र लसीकरणावेळी सादर करावे लागणार आहे.