*भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरी विधानसभेची संघटनात्मक बैठक झाडे सेलिब्रेशन हॉल ब्रम्हपुरी येथे संपन्न …*
दिं.०९ सप्टेंबर २०२४
ब्रम्हपुरी:- भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरी विधानसभेची विस्तृत संघटनेची बैठक झाडे सेलिब्रेशन हाँल आरमोरी रोड,ब्रम्हपुरी येथे भाजपा पदाधिकाऱ्यांसह गडचिरोली/चंद्रपूर दोन्ही जिल्हाचे प्रभारी म्हणून आलेले *अनुसुचित जाती / जनजाती सांसदीय समितीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री मान.श्री. फग्गनसिंह कुलस्ते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते व माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर* यांच्या नेतृत्वात विस्तृत बैठक आयोजित करुन पार पडली.
या बैठकिला मान.श्री.फग्गनसिंह कुलस्ते यांनी संघटनेबद्दल विस्तृत व व्यापक दृष्टिकोनातुन पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. संघटनेच्या कामाला लागून विजयी संकल्पासाठी काम केले पाहिजे.व भाजपा संघटनेसाठी कार्यकर्ते यांनी वेळ दिला पाहिजेत असे विस्तृत मार्गदर्शन यावेळी केले.
या बैठकीचे समारोप करतांना मा.खा.अशोकजी नेते यांनी बोलतांना म्हणाले पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संघटनेचे काम करतांना संघटन कसे केले पाहिजे. आगामी येणाऱ्या विधानसभेची तयारी व बुथ रचनात्मक संघटन तसेच नियोजन करत कार्य केले पाहिजे.भाजपा विकासात्मक दुष्टीकोन ठेऊन कार्य करित असते. लोकसभेत झालेल्या पराभवाची अनेक कारणे आहेत यात विरोधक संविधान बदलविणार, महिलांन च्या खात्यात महिण्याला साडेआठ हजार रुपये देऊ असे अनेक खोट नाट आरोप करत विजय प्राप्त केला. लोकसभेत झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती न करता किंंवा खचून न जाता आगामी येणाऱ्या विधानसभेत कार्यकर्ते यांनी पुन्हा जोमाने कामाला लागून विजयाचा संकल्प करा. असे व्यक्तव्य समारोप करतांना मा.खा.नेते यांनी याप्रसंगी केले.
या प्रसंगी प्रामुख्याने विस्तारक प्रा.कादर शेख सर,महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.वंदना ताई शेंडे,ब्रम्हपुरी भाजपा तालुकाध्यक्ष अरुणजी शेंडे, शिंदेवाही तालुकाध्यक्ष श्रीराम पा. डोंगरवार, सावली तालुकाध्यक्ष अर्जुनजी भोयर, शहराध्यक्ष अरविंदभाऊ नांदुरकर,माजी सभापती संतोष भाऊ तंगडपल्लीवार,माजी सभापती नागराज गेडाम, तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकिचे संचालन मनोज वठ्ठे, आभार व बैठक यशस्वीतेसाठी भाजयुमोचे जिल्हा महामंत्री तनय देशकर,ता.महामंत्री सचिन सा.तंगडपल्लीवार साकेत भानारकर, सूयोग बाळबुद्धे, मनोज भुपाल,रामलाल दोनाडकर, प्रा.अशोकजी सालोटकर, यशवंत आंबेरकर तसेच पदाधिकारी यांच्या सहकार्याने बैठक पार पडली.