*रविवारी मॉडेलिंग व फॅशन शो चे आयोजन*

29

*रविवारी मॉडेलिंग व फॅशन शो चे आयोजन*

मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

*सिने अभिनेत्री सारा खान येणार*

 

*गडचिरोली:-* येथील संस्कृती हॉल मध्ये रविवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता मॉडेलिंग व फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात येणार असून या साठी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सारा खान विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून अन्य मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

उल्लेखनीय म्हणजे या आधी ‘ ग्लॅम फेस ऑफ विदर्भ फॅशन शो ‘ सिझन वन आणि सिझन टू झाले आहे, आता ‘मेगा ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र फॅशन शो’ सिझन वन असून या मध्ये मॉडेलिंग स्पर्धा, मेकअप आणि मेहंदी स्पर्धा या शिवाय फॅशन शो असे अनेक उपक्रमे राबविले जाणार असून स्पर्धेतील विजेत्यांना अवॉर्ड फंक्शन मध्ये गिफ्ट हँम्पर, शिल्ड मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे. मॉडेलिंग व फॅशन शो मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजिका ज्योती उंदीरवाडे यांनी केले आहे.