आंतरमहाविद्यालयीन पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न.. (सायबर पोलिस स्टेशन आणि शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचा संयुक्तिक उपक्रम)

121

आंतरमहाविद्यालयीन पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न..

(सायबर पोलिस स्टेशन आणि शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचा संयुक्तिक उपक्रम)

 

अकोला: येथील गोडबोले प्लॉटस स्थित शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयामध्ये नुकतेच आंतर महाविद्यालयीन पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते  ही स्पर्धा सायबर सेल, अकोला आणि शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या सहयोगाने घेण्यात आली.

 

स्पर्धेचे उद्घाटन, सायबर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल श्री प्रशांतजी केदारे, कॉन्स्टेबल श्री अभिजित पहुरकर, कॉन्स्टेबल कु. सपना अटकलवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जगदीश साबू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे परीक्षक प्रा. राम घायाळकर, संगणकशास्त्र विभाग, आर एल टी महाविद्यालय, श्री अजयजी गिरी , भिकमचंद विद्यालय, अकोला, आय क्यू ए सी चे समन्वयक प्रा.डॉ. मनोजकुमार मालपाणी, भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. संजय देवडे, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. दीप्ती पेटकर, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

या स्पर्धेमध्ये श्री शिवाजी महाविद्यालय, आर एल टी विज्ञान महाविद्यालय आणि खंडेलवाल महाविद्यालयातील 140 विद्यार्थ्यांनी 75 पोस्टर्स चे सादरीकरण करून सहभाग नोंदवला.या स्पर्धेचा विषय होता ” सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा”.

 

या मध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, इतर सोशल मीडिया, गेमिंग द्वारे, फोटोमॉर्फिंग, फिशिंग, स्टोकिंग, बुलिंग, लॉटरी, लोन, एटीएम, फेक कॉल्स, फेक मेसेजेस,डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केटच्या फेक लिंक्स आणि ॲप्स याद्वारे कसी फसवणूक होते याविषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली. अशी ऑनलाईन किव्हा इंटरनेट, मोबाईल च्या माध्यमातून फसवणूक होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी आणि कसे जागृत राहावे हेही सांगण्यात आले. व्हॉट्सॲपच्या सेटिंग मध्ये टू- स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करावे, https असलेल्याच वेबसाइट्स व्हीजीट कराव्या, फ्री ॲप्स डाऊनलोड करू नये, ॲप्स डाऊनलोड करतांना सर्व परमिशन्स देऊ नये, अंनोन कॉल्स उचलू नये, अंनोन लिंक्स क्लिक करू नये, त्या तपासून पहाव्या, फेक मेल्स ची वैधता तपासूनच रिप्लाय द्यावा, ओ टि पी किंव्हा व्हेरिफिकेशन कोड शेअर करू नये, स्टाँग पासवर्ड ठेवावा, अशा विविध सुरक्षा टिप्स सांगून जागृत केले.

 

उद्घाटन प्रसंगी सायबर सेल पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री प्रशांत जी केदारे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि सायबर वॉरियर्स यांना प्रत्यक्षात घडलेल्या आर्थिक आणि सोशल मीडिया वरील सायबर गुन्ह्यांची माहिती सांगून कसी काळजी घावी या विषयी मार्गदर्शन केले.जर गुन्हा घडत असेल तर त्वरित 24 तासांच्या आत 1930 या शासकीय हेल्पलाईन नंबरवर कळवावे.त्यानंतर सायबर पोलिस स्टेशन मध्ये स्वतः जावून गुन्हा घडल्याचा F I R करावा असे सांगितले. अध्यक्षीय समारोपीय भाषणात मा. प्राचार्य डॉ. साबू यांनी इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत ऑनलाईन गुन्ह्यांची वाढती संख्या कमी करण्यासाठी किव्हा फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येकाने सायबर सुरक्षेचे नियम पाळले पाहिजेत असे सांगून, स्वतः जागृत होऊन इतरांना जागृत करण्याचे आव्हान या वेळी उपस्थितांना केले.

 

सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये शिवाजी महाविद्यालय, आर एल टी महाविद्यालय, खंडेलवाल महाविद्यालय, गीता देवी खंडेलवाल फार्मसी कॉलेज भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय आणि खंडेलवाल इंग्लिश स्कूल चे एकूण 2500+ विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक यांनी पोस्टर्स चे अवलोकन करून आणि माहिती घेऊन स्वतः ला सायबर सुरक्षित करून घेतले.

 

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. ताराताई हातवळणे, सचिव, श्री गोपालजी खंडेलवाल, उपाध्यक्ष श्री नानासाहेब कुलकर्णी, भिकमचंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वानखेडे, प्रोफेसर्स, पालक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी पोस्टर प्रदर्शनी ला भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

 

समारोपीय कार्यक्रमात परीक्षक प्रा. घायाळकर सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे घोषित करून अभिनंदन केले. यामध्ये प्रथम पुरस्कार रिद्धी माहोरे, वैष्णवी पवार, आर एल टी कॉलेज, द्वितीय पुरस्कार अदिती चंदन, गायत्री भिसे,कृतिका भांडे, श्री शिवाजी कॉलेज, तृतीय पुरस्कार, स्नेहा लुलेकर, मधुरा वडतकर, ऐश्वर्या गावंडे, नंदिनी अग्वाने, खंडेलवाल कॉलेज,चतुर्थ पुरस्कार, मृणालिनी कदम, निवेदी लाडीवकर, खंडेलवाल कॉलेज आणि पंचम पुरस्कार, कावेरी हिंगणे, प्रणाली पिंपलकर, खंडेलवाल कॉलेज, कृत्तिका चौधरी, प्रेरणा तायडे, आर एल टी कॉलेज या विद्यार्थ्यांनी मिळविला.स्पर्धेच्या उत्तम आयोजनासाठी आणि यशस्वीतेसाठी सायबर क्लब मेंबर्स आणि सायबर वॉरियर्स यांनी महत्वपूर्ण कार्य केले. यावेळी विद्यार्थ्यांना सुरक्षा टिप्स असलेले माहिती पत्रकाचे वाटप करून मोबाईल आणि इंटरनेटच्या कमीत कमी आणि योग्य वापर करण्यासाठी शपथ दिली. स्पर्धेचे प्रास्ताविक व आभार, अभियानाचे समन्वयक डॉ. हरिदास खरात यांनी केले तर संचालन सानिका वाघमारे हिने केले.