*!गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी व बाहेर जिल्ह्यातील धरणातील पाणी विसर्गामुळे झालेल्या नुकसानीची राज्य सरकारने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी!* –

38

*!गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी व बाहेर जिल्ह्यातील धरणातील पाणी विसर्गामुळे झालेल्या नुकसानीची राज्य सरकारने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी!* –

 

*!गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करण्यात यावा!*

*!जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेमार्फत राज्य सरकारला निवेदन!*

 

*!प्रणय भाऊ खुणे -प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना!*

 

*दिनांक 11 सप्टेंबर 2024* *गडचिरोली जिल्ह्यात नुकताच दोन-तीन दिवसाच्या अविरत अतिवृष्टी व पावसाच्या कहरामुळे जिल्ह्यातील, वैनगंगा, पोहर गाढवी, पामुलगौतम , इंद्रावती ,कठाणी ,दिना ,सती , पाल व प्रामुख्याने जिल्हयातील समस्त नदी नाल्यामध्ये अन्य जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे खुले केल्यामुळे पाण्याचा प्रचंड विसर्ग झाला आणि त्यामुळे नदी नाल्याच्या आजूबाजूला नागरी वस्तीने राहणारे अनेक लोकांचे घरे पाण्याखाली डुबले त्यामुळे नागरिकांचे जीवन अस्तव्यस्त झालेआहे , नदी नाल्याजवळ नागरी वस्ती करून राहणारे नागरिकांचे जीवन यामुळे हाल बेहाल झाले आहेत*

*तसेच नदी नाल्याच्या आजूबाजूला असणारे शेतकऱ्यांचे शेतीत लागवड केलेल्या धान व इतर पिकाचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोसीखुर्द व इतर धरणाच्या पाणी वीसर्गामुळे झालेल्या नुकसानीचा गडचिरोली जिल्ह्यातील तमाम नागरिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच गडचिरोली जिल्हात ओला दुष्काळ घोषित करण्यात यावा अशी मागणी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे ,यांनी जिल्हाधिकारी दैने साहेब यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनाचे वतीने निवेदन दिले,यावेळी राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद भाई अली , जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना दहाडे, पुरुषोत्तम गोबाडे,राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष मनीषाताई मडावी , व महिला आघाडी पदाधिकारी लक्ष्मी कन्नाके, तेजस्विनी भजे, मंजुषा आत्राम, शितल चीकराम राष्ट्रीय मानवाधिकार संघटना भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर व स्वप्नील मडावी , देवानंद खुणे एटापल्ली व पदाधिकारी यांनी केली आहे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या द्वारेआज निवेदन देऊन सदर मागणी केलीआहे* *व गडचिरोली जिल्ह्यातील तमाम नागरिकांना व शेतकऱ्यांचा झालेला सदर नुकसान राज्य सरकारने भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे*