तुम्ही “शेर” असाल तर मी तूमचीच मुलगी आहे, मी “शेरनी”‍ आहे – भाग्यश्री आत्राम

55

 

 

तुम्ही “शेर” असाल तर मी तूमचीच मुलगी आहे, मी “शेरनी”‍ आहे – भाग्यश्री आत्राम

 

अहेरी: वडिलांच्या टिकेला आज त्यांच्या मुलीने सणसणीत उत्तर दिले. तुम्ही “शेर” असाल तर मी तूमचीच मुलगी आहे, मी “शेरनी” आहे. तुमच्य तलवारीला दोन्ही बाजूला धार असली तरी मी दुर्गा आहे. दहा हात माझ्याकडे आहेत. नवरात्र लवकरच येत आहे. व माझ्याकडेही मोठे हत्यार आहे. मला दुर्गा, चंडिका होण्याची संधी देउ नका अन्यथा खैर नाही. माझ्या कार्यकर्त्यांना कुणी हात लावायची हिंमत केली तर त्याचे हात छाटून टाकू असे भाग्यश्री आत्रामांनी सांगत आपला रूद्रावतार दाखवून दिला

राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार यांच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज अहेरीत दाखल झाली. यावेळी पक्षाचे प्रातांध्यक्ष जयंत पवार, नेते अनील देखमुख यांच जंगी स्वागत करण्यात आल. नगरातून रॅलीव्दारे यावेळी भाग्यश्री आत्राम यांनी शक्तीप्रदर्शन केलं. पावसामुळे सभागृहात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मोठया संख्येनी नागरिकांची उपस्थिती होती. आपल्या मार्गदर्शनातून जयंत पाटील यांनी भाग्यश्री आत्राम यांचं स्वागत केल. अहेरी विधानसभा हा आमच्या हक्काचा मतदारसंघ आहे. यामुळे यावेळी आम्ही पूर्ण ताकदीने हा किल्ला लढवू, या मतदारसंघात स्वत पवार साहेब येतील, मी प्रत्येक तालुक्यात प्रचार करेन असे ते म्हणाले. धर्मराव आत्राम हे मंत्री आहेत. पण त्यांच्या मतदारसंघातील, नगरातील रस्ते बघितले कि किव येते असा टोला त्यांनी हाणला. सुरजागड लोहप्रकल्प झाला. पण येथे बाहेर राज्यातील लोकांना रोजगार देण्याचे पाप सुरू आहे. पण आता आमची सरकार येणार आहे.

आपल्या मार्गदर्शनातून भाग्यश्री आत्राम यंानी अजीत पवारंवर जोरदार टिका केली. ते स्वत पवार साहेबांना सोडून गेले. अनं मला सल्ला दयायला निघाले. मी स्वत पवार साहेंबांना तिनदा भेटली. व माझी भूमीका मांडली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम हे भाजपच्या वाटेवर होते. तेव्हा बाबांसोबत अजीत पवार यांच्याकडे उमेदवारी मागालया गेलो असता तिकीटीची भिक मागता का असे ते म्हणाले होते. एवढेच नव्हे तर धर्मराव आत्राम जर भाजपच्या तिकीटवर लढत असतील तर तुम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढा असे अजीत पवार यांनी सांगितल्याच भाग्यश्री आत्राम म्हणाल्या.

महाविकास आघाडीचा जागासंदर्भात निर्णय व्हायचा आहे. पण अहेरी विधानसभेतून आमचाच उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे या जागेवर आम्हीच दावा करणार असल्याच जयंत पाटील म्हणाले यामुळे आता या विधानसभा मतदारसंघात पितापुत्रीची लढाई होणार हे स्पष्ट झाले आहे