*फुटबॉलच्या स्पर्धेतून आंतराष्ट्रीय खेळाळू निर्माण व्हावे -राजे अम्ब्रिशराव महाराज*

21

*फुटबॉलच्या स्पर्धेतून आंतराष्ट्रीय खेळाळू निर्माण व्हावे -राजे अम्ब्रिशराव महाराज*

 

 

*मूलचेरा तालुका क्रीडा संकुल येथे फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात संपन्न*

 

 

*मूलचेरा:-* तालुक्यातील विवेकानंदपूर येथील तालुका क्रीडा संकुल येथे स्वामी विवेकानंद फुटबॉल कमिटी तर्फे गेल्या सात दिवसा पासून फूटबॉल सामने सुरू आहेत.मोठ्या संख्येने फुटबॉल स्पर्धकांनी यावेळी हजेरी लावली होती.यावेळी फुटबॉल प्रेमीनी क्रीडा संकुल तुडूंब भरून होत.!

 

फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज तर प्रमुख अतिथी म्हणून कुमार अवधेशरावबाबा आत्राम हे होते.त्यावेळी त्यांचे कमिटी तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

 

फुटबॉल स्पर्धेत मार्गदर्शन करताना राजे साहेब म्हणाले फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे.आपल्या क्षेत्रातील बंगाली बहुल भागात मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. या मैदानाच्या माध्यमातून उत्कृष्ट दर्जाचे उत्तम खेळाडू घडतील, आपल्या क्षेत्राचा नावलौकिक वाढेल तसेच या फुटबॉलच्या स्पर्धेतून आंतराष्ट्रीय खेळाळू निर्माण व्हावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

पुढे बोलताना ते म्हणाले या तालुका क्रिडा संकुलाची निर्मिती माझ्या कार्यकाळात झाली.येणाऱ्या काळात या क्रिडा संकुल मध्ये जा सुवीधाचा अभाव आहे,तो मी पूर्ण करून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करणार असे आश्वासन यावेळी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी दिले.

 

यावेळी गौरव बाला फॅन्स क्लब तर्फे नायजेरिया येथील संघाने आपलं उत्तम प्रदर्शन करून सर्व प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित केलं.

या स्पर्धेसाठी प्रथम क्र.विजेत्या गांधीनगर संघाल माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या तर्फे 50000-/(पन्नास हजार रुपये) देण्यात आले तर भाजपा जिल्हा सचिव बादल शाह यांच्या तर्फे द्वितीय क्र.विजेत्या नायजेरिया संघाल 31000/-(एकतीस हजार रुपये) पारितोषिक देण्यात आले.तर

संपूर्ण स्पर्धेसाठी ट्रॉफी पुरस्कार हा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या तर्फे 35000/-(पस्तीस हजार रुपये) देण्यात आले.

 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ उरेते,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती,तालुका अध्यक्ष संजीव सरकार,शहराध्यक्ष दिलीप आत्राम,महामंत्री विजय बिश्वास,तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर मलिक,सरफराज आलम,शुभम कुत्तरमारे तसेच मोठ्या संख्येने युवा व महिला वर्ग उपस्थित होते.!