हिरापूर येथे घराला लागली आग

165

हिरापूर येथे घराला लागली आग

सावली तालुक्यातील घटना

अंदाजे 70 हजाराचे नुकसान

सावली (ता. प्र.)
तालुक्यातील हिरापूर येथे आज (दि.1) रोजी दुपारच्या सुमारास यामिना ईश्वर मडावी यांच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागण्याची घटना घडली. अचानक घराला लागलेल्या आगीमुळे गावातील ग्रामस्थांनी वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणातीही जीवित हानी झाली नाही. आगीत घराचे कवेलू, फाटे, अनाज, कपडे इत्यादींचे अंदाजे 70 हजार रुपयाचे नुकसान झाले.
सविस्तर व्रुत्त असे की, हिरापूर येथील यामिना मडावी ही पोटाची खडगी भरण्यासाठी मजुरीचे कामावर जात असते. नेहमी प्रमाणे आज सुध्दा सदर महिला रोजंदारीचे कामावर गेली असता तिच्या घराला अचानक आग लागली. त्यामुळे गावात धावाधाव सुरू झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी गावकर्यांनी कसोशीचे प्रयत्न केले. व आग आटोक्यात आणली. सदर महिला ही गरीब, मोलमजुरी करणारी असल्याने अचानक लागलेल्या आगीमुळे तिचा संसार उघड्यावर आलेला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी अ. भा. आ. वी. प. चे युवा जिल्हाध्यक्ष अतुल कोडापे यांच्यासह गावकर्यांनी केली आहे.