*जेप्रा जिल्हा परिषद शाळेला आझाद समाज पार्टीची भेट…!* ——————- छत उडाला तर केली पाहणी

27

*जेप्रा जिल्हा परिषद शाळेला आझाद समाज पार्टीची भेट…!*

——————-

छत उडाला तर केली पाहणी

——————

 

जेप्रा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारती वरील टीनाचे छत मे महिन्यात वादळाने उडून गेले होते. शाळेतील मुख्याध्यापक आणि गावातील ग्रामपंचायत ने याबाबत पाठपुरावा केला परंतु प्रशासनाने अद्याप इमारतीची दुरुस्ती न केल्याने मुलांची हेळसांड होत आहे.

याबाबत आझाद समाज पार्टी चे जिल्हा सचिव किशोर नरुले यांनी विषयाची माहिती घेऊन पक्षाचे प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार यांच्या सोबत शाळेला भेट देऊन इमारतीची पाहणी केली. यावेळी गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

लवकरच आझाद समाज पार्टीच्या वतीने प्रशासनाला जाब विचारण्यात येणार आहे. आणि लवकरात लवकर इमारत दुरुस्तीची मागणी करण्यात येईल…!

 

*अब बात होगी क्रांती से…!*

 

प्रस्थापित पक्ष प्रचारात व्यस्त, मात्र जनतेच्या प्रश्नावर दुर्लक्ष…

—————–

दि. 13 सप्टेंबर 2024

 

🎯 *ASP MEDIA गडचिरोली*