पदोन्नती प्रक्रियेत शिक्षकांवर अन्याय! – मनमर्जीने नियुक्ती दिल्याचा आरोप

14

पदोन्नती प्रक्रियेत शिक्षकांवर अन्याय!

– मनमर्जीने नियुक्ती दिल्याचा आरोप

गडचिरोली ब्युरो.

जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागातील पदोन्नतीत मोठ्या प्रमाणात अनियमिता असल्याचे निदर्शनास येत आहे. पदोन्नती प्रक्रियेती अटी व शर्तीला तिलांजली देत प्रशासनाला अंधारात ठेवून मनमर्जीने शिक्षणाधिका-यांद्वारे पदोन्नती दिल्या जात असून यामुळे पात्र शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप शिक्षकांद्वारे होत आहे. त्यामुळे सदर नियुक्ती तत्काळ रद्द करुन नव्याने पद भरती घेऊन शिक्षकांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाने निवेदनातून केली आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागातील पदोन्नती सुरु आहे. याअंतर्गत शिक्षक तसेच केंद्राप्रमुखांच्या पदोन्नती शिक्षणाधिका-यांद्वारे केल्या जात आहेत. मात्र शासनाने ठरविलेल्या अटी व शर्तीप्रमाणे समुपदेशन करणे अनिर्वाय असतांना असे न करता शिक्षणाधिकारी प्रशासनाला अंधारात ठेवून मनमर्जीने नियुक्ती करीत असल्याचा आरोप शिक्षक वर्गातून होत आहे. यासंदर्भात शिक्षकांच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचेकडे प्राप्त झाल्या. जिप शिक्षण विभागांतर्गत शिक्षक, केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रियेत पात्र शिक्षकांवर अन्याय होत असल्याने नियुक्ती प्रक्रियेची सखोल चौकाशी करुन पदोन्नती नियुक्ती तत्काळ रद्द करावी तसेच शासनाने दिलेल्या अटी शर्तीनुसार समुपेदशन घेऊन नियुक्ती देत शिक्षकांवरी अन्याय दूर करावा, अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटी कोंडावार यांनी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रारीतून केली आहे.