*मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची भामरागडला भेट, केली पूरपरिस्थितीची पाहणी*

33

*मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची भामरागडला भेट, केली पूरपरिस्थितीची पाहणी*

 

भामरागड:रविवार (८ सप्टेंबर) पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अतिवृष्टी निर्माण झाली आहे. याचा सर्वात जास्त फटका भामरागड तालुक्याला बसला असून येथील पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम सकाळीच भामरागड मध्ये दाखल झाले.

 

गडचिरोली जिल्ह्यात रविवार पासून मुसळधार पावसाने थैमान घातला होता. पावसाचा कहर इतका होता की अजूनही जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम आहे. काही ठिकाणी परिस्थिती पूर्व पदावर येत असले तरी भामरागड तालुक्याला याचा जबर फटका बसला आहे.पर्लकोटा नदीला आलेला पुराचा पाणी गावात शिरल्याने येथील नागरिकांचा मोठा नुकसान झाला. गेली तीन ते चार दिवस भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी देखील संपर्क तुटला होता. सध्या पर्लकोटा नदीचा पूर ओसरला असून आलापल्ली ते भामरागड हा मार्ग देखील रहदारीसाठी सुरू झाला आहे.

 

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी यादरम्यान भ्रमणध्वनी द्वारे नागरिकांच्या संपर्कात होते.आज १३ सप्टेंबर रोजी नागपूरहून थेट भामरागड गाठत पूर परिस्थितीचा आढावा घेत पाहणी केली. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने भरपाई देण्यासाठी त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले.

 

यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम,नायब तहसीलदार रेखा वाणी,नायब तहसीलदार मोरेश्वर मेश्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते, नगरपंचायत चे मुख्याधिकारी अभिजीत सोनवणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण चौधरी,ज्येष्ठ कार्यकर्ते सीताराम मडावी,राष्ट्रवादी काँग्रेसचे भामरागड तालुकाध्यक्ष रमेश मारगोनवार,जेष्ठ कार्यकर्ते सब्बर बेग मोगल,आदी उपस्थित होते.

 

*ग्रामीण रुग्णालयाला दिली भेट*

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी भामरागड तालुका मुख्यालयातील विविध प्रभागात भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. येथील नागरिकांशी आस्थेने संवाद साधले.दरम्यान त्यांनी तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांशी देखील संवाद साधले.यावेळी त्यांनी सौ.मंतोश्री गजेंद्र चौधरी (२४) रा.आरेवाडा या मातेशी आस्थेने संवाद साधत प्रकृतीबाबत विचारपूस केली. याच महिलेचे प्रसूती दरम्यान अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे गडचिरोली पोलिसांनी तक्तकल हेलिकॉप्टरने दुर्मिळ बी-निगेटिव्ह रक्तगटाची पिशवी पाठवत प्राण वाचविले होते हे विशेष.