*इनरव्हील क्लबच्या माध्यमातून गरजूंच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न:-माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे*

21

*इनरव्हील क्लबच्या माध्यमातून गरजूंच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न:-माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे*

 

*इनरव्हील क्लब गडचिरोलीच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय बॅग,नोटबुक व पेनचे वाटप*

 

*गडचिरोली :-दि.१६ सप्टेंबर*

 

*आपल्या सभोवताली अनेक गरजु लोक आहेत.इनर व्हील क्लब च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे व गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न इनर व्हील क्लब करीत आहे.असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले.*

*इनर व्हील क्लब गडचिरोलीच्या वतीने स्थानिक मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय बॅग,नोटबुक व पेनचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन बोलत होत्या.*

*याप्रसंगी इनर व्हील क्लब 303 च्या जिल्हा उपाध्यक्ष सौ.रमाताई गर्ग,इनरव्हील क्लब गडचिरोली अध्यक्ष सौ.प्रतिभाताई रामटेके, सचिव सौ.विजयाताई चव्हाण,चंद्रपूर जिल्हा सचिव सौ.पल्लवीताई,माजी अध्यक्ष सौ.सुधाताई राठी,सौ.मिराताई सारडा,सौ.मंजुताई काबरा,श्रीमती प्रतिभाताई चौधरी व इनरव्हील क्लब गडचिरोलीचे सदस्य उपस्थित होते.*

*यावेळी उपस्थित मान्यरांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय बॅग,नोटबुक व पेनचे वितरण करण्यात आले.*

*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शिखाताई काबरा यांनी केले तर आभार सौ.वैशालीताई बट्टूवार यांनी मानले.*