*काँग्रेस ची 19 सप्टेंबर पासून जिल्ह्यात परिवर्तन यात्रा ; यात्रेच्या माध्यमातून राज्यातील महाभ्रस्ट महायुती सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा*
गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील विविध भागात परिवर्तन यात्रा काढण्यात येणार आहे, या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकारचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावा गावात जाऊन जनतेसमोर राज्यातील महायुती सरकारच्या अपशाचा व हुकूमशाही धोरणाचा पाढा वाचणार आहेत. 19 सप्टेंबर रोजी चामोर्शी तालुक्यातील चपराळा पासून या परिवर्तन यात्रेला सुरुवात होणार आहे. या परिवर्तन यात्रेसंदर्भात शासकीय विश्राम भवन गडचिरोली येते बैठक पार पडली असून या बैठकीला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवराव किरसान साहेब, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे, माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड. राम मेश्राम साहेब, शहराध्यक्ष सतीश विधाते, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, चामॉर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, रमेश चौधरी, खरवडे सर,अनुसुचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, संतोष भांडेकर, जिल्हा महासचिव घनश्याम वाढई, उपाध्यक्ष अनिल कोठारे, सुमीत तुरे, हरबाजी मोरे, नेताजी गावतुरे सर, दिवाकर निसार, नदीम नाथानी, महिला तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, वर्षाताई आत्राम, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, श्रीनिवास ताडपल्लीवार, ठाकरे साहेब, विपुल येलट्टिवार, गौरव येनप्रेड्डिवार, कुनाल ताजने, अनिकेत राऊत, स्वप्निल बेहरे सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.