*भारतीय जनता पार्टी आरमोरी विधानसभेची संघटनात्मक बैठक श्री. गजानन महाराज मंदिर माता वार्ड देसाईगंज (वडसा) येथे संपन्न …*
दिं.१९ सप्टेंबर २०२४
देसाईगंज:- भारतीय जनता पार्टी आरमोरी विधानसभेची विस्तृत संघटनेची बैठक श्री. गजानन महाराज मंदिर माता वार्ड देसाईगंज (वडसा) येथे भाजपा पदाधिकाऱ्यांसह गडचिरोली/चंद्रपूर दोन्ही जिल्हाचे प्रभारी म्हणून आलेले *अनुसुचित जाती / जनजाती सांसदीय समितीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री मान.श्री. फग्गनसिंह कुलस्ते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे* यांच्या नेतृत्वात विस्तृत बैठक आयोजित करुन पार पडली.
या बैठकिला मान.श्री.फग्गनसिंह कुलस्ते यांनी संघटनेबद्दल विस्तृत व व्यापक दृष्टिकोनातुन पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. संघटनेच्या कामाला लागून विजयी संकल्पासाठी काम केले पाहिजे.व भाजपा संघटनेसाठी कार्यकर्ते यांनी वेळ दिला पाहिजेत असे विस्तृत मार्गदर्शन यावेळी केले.
या बैठकीला मा.खा.अशोकजी नेते यांनी बोलतांना म्हणाले भारतीय जनता पार्टी चा बुथप्रमुख,शकती केंद्र प्रमुखांसह पदाधिकारी व कार्यकर्ते हा पक्ष संघटनेचा मुख्य घटक आहे. आगामी येणाऱ्या विधानसभेची तयारी व बुथ रचनात्मक संघटन तसेच नियोजन करत कार्य केले पाहिजे.भाजपा विकासात्मक दुष्टीकोन ठेऊन कार्य करित असते. लोकसभेत झालेल्या पराभवाची अनेक कारणे आहेत यात विरोधक संविधान बदलविणार, महिलांन च्या खात्यात महिण्याला साडेआठ हजार रुपये देऊ असे अनेक खोट नाट आरोप करत विजय प्राप्त केला. लोकसभेत झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती न करता किंंवा खचून न जाता आगामी येणाऱ्या विधानसभेत कार्यकर्ते यांनी पुन्हा जोमाने कामाला लागून विजयाचा संकल्प करा. असे व्यक्तव्य या बैठकीला मा.खा.नेते यांनी याप्रसंगी केले.
या प्रसंगी प्रामुख्याने जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे,महिला मोर्चा च्या प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस,कुरखेडा भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेवजी फाये,आरमोरी तालुकाध्यक्ष पंकज भाऊ खरवडे,या संघटन बैठकीचे संचालन तथा जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे, अनु.जाती मोर्चा चे अँड.उमेशजी वालदे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलूभाई हुसैनी, चामोर्शी नगरसेविका सोनाली ताई पिपरे,तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.