*सातत्यपूर्ण अभ्यास करुन आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेला पुढे जा:मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम*
*एटापल्ली येथे करिअर मार्गदर्शन सेमिनार*
एटापल्ली:स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अल्प आहे.त्यात आपला जिल्हा बराच मागे आहे.असे असलेतरी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या आपल्या भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात येत आहे.त्यासाठी विविध मार्गदर्शन शिबिर,मोफत स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वाटप व परीक्षेच्या स्वरूपाची चांगली कल्पना देण्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे.असे आवाहन असे आवाहन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
एटापल्ली येथील क्रीडा संकुल सभागृहात नारायणा आयएएस अकॅडमी तर्फे करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.या सेमिनार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी प.स.सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, तहसीलदार हेमंत गांगुर्डे,उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, राकॉचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, माजी जि.प.सदस्य संजय चरडुके,श्रीकांत कोकुलवार,मनीष धूर्वे रोजा तलांडे ,प्राध्यापक कराडे,अतुल परशुरामकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री डॉ आत्राम यांनी विद्यार्थ्यांनी दिवसभराचे मिनिट टू मिनिट नियोजन करावे.वेळेचे सुरळीत व्यवस्थापन करुन अभ्यासक्रमातील बारकावे ओळखावे.अभ्यासक्रमातील संबंधित विषयांची माहिती घेऊन त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास करुन आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी तरच यशप्राप्ती होईल, विद्यार्थ्यांनी अगोदर आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे.सातत्यपूर्ण जिद्दीने अभ्यास करुन स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करता येते.असे प्रतिपादन देखील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
आयोजित कार्यक्रमात इतर मान्यवरांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले.या सेमिनार मध्ये एटापल्ली तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी तसेच इतर विद्यार्थी देखील हजर होते.सेमिनार मध्ये विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा पुस्तक वाटप करण्यात आले व तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. यावेळी एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.